23.5 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ रानडुकराच्या हल्यात तिघे जखमी

रानडुकराच्या हल्यात तिघे जखमी

0
22

तिरोडा,दि.06ः-तालुक्यातील इंदोरा बु. गावशिवारातील शेतात गेलेल्या तीन शेतकर्‍यांवर रानडुकराने हल्ला चढविला. दरम्यान तिन्ही शेतकरी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. प्रभुदास अंबुले, टेकचंद काळसर्पे, फलीराम सोनवाने अशी जखमी शेतकर्‍यांची नावे आहेत. तालुक्यातील इंदोरा बु. परिसरात रब्बी पीक हंगाम सुरू आहे. अनेक शेतकर्‍यांनी पिकांची लागवड केली. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांचे नियमित शेतात येणे-जाणे सुरू असते. यानुरूप शेतकरी प्रभुदास अंबुले, टेकचंद काळसर्पे, फलीराम सोनवाने हे शेतकरी आपापल्या शेतात शेतकामासाठी गेले. दरम्यान, दबा धरून असलेल्या रानडुकराने दोन शेतकर्‍यांवर हल्ला चढविला. आरडाओरड झाली असताना तिसरा शेतकरी मदतीसाठी गेला असता त्याच्यावरही रानडुकराने हल्ला चढविला. या घटनेत तिन्ही शेतकरी गंभीर जखमी झाले. दरम्यान, तिन्ही शेतकर्‍यांना उपचारासाठी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र्रात दाखल करण्यात आले