26.4 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ दुय्यम तमाशा कार्यक्रमात शहिदांना श्रध्दांजली

दुय्यम तमाशा कार्यक्रमात शहिदांना श्रध्दांजली

0
37

आमगाव,दि.20ः- तालुक्यातील गोरठा येथे साॅई मंदिराचा 21 व्या वर्धापन दिवसानिमित्ताने आयोजित दुय्यम तमाशा कार्यक्रमात पुलवामा हल्यातील शहिदांना श्रध्दांजली वाहून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.एन.डी.किरसान होते.प्रमुख अतिथी म्हणून गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव सहषराम कोरोटे,  पं.स.सदस्य लोकेश अग्रवाल,उद्घोगपती रितेश ( बंटी ) अग्रवाल, आनंद अग्रवाल,पप्पू असाटी उपस्थित होते. शाहीर  बुधाभाऊ साथी अन्ना विरूद्ध शाहीर माणिकराव देशमुख यांच्यात हा कव्वालीचा सामना रंगला.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन आयोजक  इसुलाल भालेकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक  सिताराम शर्मा,गोमाजी पाथोडे,तेजराम बावने,श्रीराम चुटे,टेकेशवर मेंढे,शिवनाथ थेर,धर्मराज चुटे,बंडू पाथोडे,श्रीराम पाथोडे यांनी प्रयत्न केले.