29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home शैक्षणिक जतच्या बीडीओंना भेटले शिक्षक भारतीचे शिष्टमंडळ

जतच्या बीडीओंना भेटले शिक्षक भारतीचे शिष्टमंडळ

0
46

blank

जत(राजभक्षर जमादार),दि.14ः- तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचे थकीत वीज बिल ग्रामपंचायतीच्या 14 वित्त आयोगाच्या निधी मधून भरण्यासंबधी मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे पत्र असतानाही  तालुक्यातील ग्रामसेवकाकडून शाळेच्या मुख्याध्यापकाना सहकार्य केले जात नसल्याची माहिती शिक्षक भारती पदाधिकार्यानी गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन दिली.यावर गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांनी मुख्यकार्यकारी अधिकार्यांच्या पत्राची अंमलबजावणी करण्याबाबत तात्काळ आदेश काढण्याचे आश्वासन दिले.तसेच शिक्षकांच्या पेंडिंग बिलाबाबत चर्चा केली असता सर्व बिले मार्च अखेर काढण्यात येणार असल्याचे सांगितले.यावेळी तालुका अध्यक्ष दिगंबर सावंत ,शौकत नदाफ ,नवनाथ संकपाळ ,मलाया नंदगाव ,बाळासाहेब सोलनकर,साधू पांढरे , भाऊसाहेब महानोर,जितेंद्र बोराडे,दशरथ पुजारी जुबेर शेख, अविनाश सुतार इ शिक्षक भारती चे पदाधिकारी उपस्थित होते.

blank