36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ राष्ट्रवादीचे नाना पंचबु्ध्दे अधिकृत उमेदवार

राष्ट्रवादीचे नाना पंचबु्ध्दे अधिकृत उमेदवार

0
63

blank

गोंदिया,दि.25ः-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून माजी राज्यमंत्री व भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे निवडणूक लढवणार असल्याची घोषणा खा. प्रफुल्ल पटेल यांनी रात्री उशीरा केली.यामुळे या मतदारसंघातून प्रफुल पटेल हे जनतेच्या निवडणुकीतून आता बाद झाल्याचे स्पष्ट झाले आहे.नाना पंचबुद्धे २००४ मध्ये भंडारा विधानसभा मतदार संघातून निवडून आले होते. २००४ च्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये ते अखरेच्यावेळी ६ महिने शिक्षण राज्यमंत्री होते. जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा नाना पंचबुद्धेंचा प्रवास आहे.ते गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत. पंचबुद्धे  यांचे  जन्मगाव भंडारा जिल्ह्यातील अर्जुनी आहे.

blank