35.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ खांबी पिंपळगावच्या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू,शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

खांबी पिंपळगावच्या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू,शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

0
25

blank

गोंदिया,दि.२५ः- त्रिपुरा स्टेट रायफलच्या ३ बटालियनचे जवान अतिराज भाऊराव भेंडारकर यांचा आजारपणामुळे मृत्यू झाला असून त्यांच्या मृतदेहावर शासकीय इतमामात आज (दि.२५) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.गोंदिया पोलीस मुख्यालयात पोलीस विभागाच्यावतीने शहिदाला आदराजंली वाहण्यात आली.अतिराज आजारी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.दरम्यान उपचार सुरु असताना २३ मार्च रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.त्रिपुरा येथून त्यांचे मृतदेह विमानाने रायपूर विमानतळावर आणण्यात आले तेथून गोंदियाला आणण्यात आले आहे.ते अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी/ पिपंळगाव येथील रहिवासी असून जन्मगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.

blank