24.5 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ रविवारला जिल्हा मध्यवर्ती बँक सुरू

रविवारला जिल्हा मध्यवर्ती बँक सुरू

0
37
भंडारा,दि.30 : मार्च महिन्याचा शेवटच्या दिवस असल्याने व सुट्टीचा दिवस असल्याने शेतकर्‍यांच्या हितासा’ी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व शाखा आज सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी सभासदांना सुचित करण्यात येते की, ज्या सभासदांनी पिक कर्ज भरले नाही, त्यांच्याकरीता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व शाखा ३१ मार्च रविवारला सुरू राहणार आहेत. ज्या सभासदांनी अद्यावत पिक कर्जाची वसुली भरली नसेल त्यांनी आज ३१ मार्च रोजी संबंधीत शाखेला जावून पिक कर्ज वसुलीचा भरणा करून व्याज सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे सरव्यवस्थापक संजय बुरडे यांनी केले आहे.