35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ मोदींच्या सभेनंतर परतताना बसला अपघात; ११ पोलीस जखमी

मोदींच्या सभेनंतर परतताना बसला अपघात; ११ पोलीस जखमी

0
27

blank

गोंदिया,दि.04 – गोंदिया येथील नवीन बायबास मार्गावरील लोकसभा निवडणुकीची  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आटोपून परतणाऱ्या पोलिसांच्या बसला बुधवारला  रात्री १० वाजताच्या सुमारास अपघात झाल्याने यामध्ये ११ पोलीस जखमी झाले आहेत.जखमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. ही घटना गोंदिया-आमगाव मार्गावर ठाणा गावाजवळील गोरेगाव मार्ग वळणरस्त्यावर घडली.या बसमध्ये पुणे येथील गृप-डी चे पोलीस कर्मचारी होते.सदर मार्गावरुन आमगावनिवासी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते रितेश अग्रवाल हे मोंदीची सभा एैकल्यानतंर परत आमगावला जात असतांना त्यांच्या समोरच ही घटना घडली.त्यांनी लगेच क्षणाचाही उशीर न करता सर्वांना मदतीचा हात देत गोंदियाच्या रुग्णालयापर्यंत आणले आणि प्राथमिक उपचार उपलब्ध करुन दिल्याबद्दल पोलीस अधिक्षक विनिता शाहू यांनी त्यांचे आभार मानले आहे.

जखमीमध्ये पोलिस शिपाई भरत धोंडीराम मालवदे,एएसआय चुन्नीलाल राठोड,अमित जगताप,डी.डी.डांगे,राहुल लोंढे,विशाल कांबळे,समर बनसोडे,एम.जे.कोळी,सत्यवान कांबळे,रवि नेवाले व विशाल कांबळे यांचा समावेश आहे.जखमीपैकी ४ ते ५ पोलीस गंभीर असल्याने त्यांना डाॅ.बजाज यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरात बुधवारी पंतप्रधान मोदींची सभा होती. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री सभा संपल्यानंतर पोलीस ठाण्याकडे परतत असताना रात्री ११.३० वाजताच्या सुमारास गोंदिया ते आमगाव रस्त्यावर अचानक बस उलटली. या बसमधून जवळपास २६ ते २७ पोलीस कर्मचारी प्रवास करत होते. हे सर्व पोलीस सालेकसा पोलीस ठाण्यात जात होते.पुण्यावरुन निवडणुकीच्या काळात सुरक्षेसाठी त्यांची याभागात ड्युटी लावण्यात आलेली आहे.

blank