28.6 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ रोहनाच्या सरपंचावर रेती चोरी प्रकरणी तीन कोटी आठ लक्ष रुपयांचा दंड

रोहनाच्या सरपंचावर रेती चोरी प्रकरणी तीन कोटी आठ लक्ष रुपयांचा दंड

0
36
नितीन लिल्हारे
मोहाड़ी,दि.23 :- ग्रामपंचायत रोहना चे सरपंच नरेश माणिक ईश्वरकर यांच्यावर अवैध रेती चोरी प्रकरणी मोहाडीचे तहसीलदार यांनी ३ कोटी ८ लक्ष रुपयांचा दंड ठोठावला असून त्यांचे सरपंचपद बर्खास्त करण्यात यावे अशी शिफारस जिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात आलेली आहे, तसेच दंडाची नोंद त्यांच्या शेतीच्या सात-बारा उताऱ्यावर सुद्धा घेण्यात आलेली आहे, यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडालेली आहे
      सरपंच नरेश ईश्वरकर रा. रोहना यांनी तीन हजार ब्रास रेती साठवणूक केल्याने त्याचे ६० लक्ष रुपये व पाचपटीने दंडाची रक्कम तीन कोटी रुपये तसेच चार ट्रकमध्ये रेती भरून कारवाईदरम्यान खाली केल्यामुळे चार ट्रकच्या दंडाची रक्कम आठ लक्ष रुपये असे एकूण तीन कोटी आठ लक्ष रुपयाचा दंड मोहाडीचे तहसीलदार धनंजय देशमुख यांनी ठोठावला आहे, तसेच घटनास्थळी मोक्यावर असलेल्या पंचनाम्यामध्ये नमूद अवैध रेती तीन हजार ब्रास साठ्याची चोरी झाल्यास किंवा त्याची विक्री व दोन्ही बाबीसाठी नरेश ईश्वरकर यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता व इतर फौजदारी कायद्यान्वये तलाठी बेटाळा यांनी नरेश ईश्वरकर यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत असा आदेश पारित केला आहे
    बेटाळा रेती घाटावर १७ मार्च २०१९ रोजी खनिकर्म विभागाच्या भरारी पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी चालवून मारण्याच्या प्रयत्न केल्याच्या आरोप सरपंच नरेश ईश्वरकर यांच्यावर लागला होता व त्यांना अटक सुद्धा करण्यात आली होती त्यावेळी बेताळा स्मशान घाटा जवळ 3000 ब्रास रेती, साठा करून ठेवल्याचे निदर्शनास आले होते, त्या रेती साठयाचा त्यावेळी पंचनामा करण्यात आला होता, हा रेती साठा नरेश इस्वरकर यांनीच केला होता, असे गृहीत धरून त्यांचेवर ही दंडात्मक कार्रवाई करण्यात आली आहे.
   लाच लुचपत विभागाने केलेल्या कार्रवाईमधे मी रेती भरण्या साठी जेसीबी किरायने देतो, असे बयान नरेश इस्वरकर यांनी दिले असून, रेती लीलावात सुद्धा त्यांनी भाग घेवून बोली लावली होती, कनिकर्म विभागाच्या धाडीत सुद्धा त्यांचेवर कार्रवाई झालेली असल्याने नरेश ईश्वरकर हे रेती व्यवसाय करतात हे सिद्ध होते, असा निष्कर्ष काढून त्यांचेवर ३ कोटि ८ लक्ष रूपयांचा दंड ठोठावन्यात आला असून, तशी नोंद त्यांच्या सर्व जमिनीवर करण्यात आली आहे. बहुधा एवढी मोठी कार्रवाई रेती प्रकरणी पहिल्यांदाच करण्यात आली असावी अशी चर्चा आहे.
सदस्यत्व रदद् करण्याची शिफारस
नरेश ईश्वरकर हे रोहणा ग्रामपंचायतचे सरपंच असून सुद्धा तसेच शासन निर्णय नुसार रेती चोरी बाबत नदी काठावरील गावात दक्षता समित्या गठित करण्यात आल्या आहेत, त्यात सरपंच हे पदसिद्ध अध्यक्ष असतात, असे असतांना त्यांनी सरपंच पदाचे कर्तव्य पार पाडन्यास कसूर केला व गैरवर्तनुक केल्यामुळे व पदाचा दुरुपयोग केल्याने ग्रा.प.अधिनियम १९५८ चे कलम ३९ अन्वये कार्रवाई करण्यात यावी अशी शिफारस जिल्हाधिकारी कड़े करण्यात आली आहे.या प्रकरणात पुढे काय होते याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे
blank