25.1 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ शिवबा मित्र मंडळाने केले वृक्षारोपण

शिवबा मित्र मंडळाने केले वृक्षारोपण

0
41
 सालेकसा,दि.09ः-सालेकसा येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुण मंडळींनी एकत्र येऊन शिवबा मित्र मंडळाची स्थापना केली. ह्या मंडळाचे उद्दिष्ट स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना येणाऱ्या अडचणींवर एकत्र येऊन मात करण्या करिता समूह कार्य करेल. पुस्तकांची देवाणघेवाण आणि निघणाऱ्या जागांबद्दल माहिती देण्याचे कार्य ह्या समूहातर्फे केला जातो. सामाजिक बांधिलकी म्हणून शिवबा मित्र मंडळ तर्फे आज स्मशान भूमी रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. एकूण 25 रोपांची लागवड करून त्यांना बांबूचे हाताने तयार केलेले सुरक्षा कठडे बांधून जनावरांपासून सुरक्षित करण्यात आले. शिवबा मित्र मंडळाचे योगेश पटले,सुमित प्रदिते, सचिन मनवर, देवशीष रहांगडाले, राहुल हटवार इत्यादी मंडळी उपस्थित होते.