घोटी येथील जिप शाळेत वृक्षारोपण

0
37

गोरेगाव,दि.09ः-तालुक्यातील घोटी येथील पुर्व माध्यमिक जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवानंद येळणे होते. यावेळी सरपंच जितेंद्र डोंगरे, मुख्याध्यापिका ए.एन.कटरे, समिती सदस्य रत्नमाला कठाणे, शिक्षिका आय.पी. पुंजे, संगीता नागनाथे, जगदिश बावणे, आर.एम. मेश्राम, श्रीमती राहूळकर व डोंगरे उपस्थित होते.
सर्वप्रथम माता शारदा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांच्या छायाचित्राचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण करून वृक्षारोपण काळाची गरज असल्याचे मार्गदर्शन विद्याथ्र्यांना केले. दरम्यान, विद्याथ्र्यांनाही प्रत्येकी एक वृक्ष देऊन विद्याथ्र्यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन आर.एम. मेश्राम यांनी केले. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.