26 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ भारत कृषक समाज महाराष्ट्र तर्फे वृक्षारोपण

भारत कृषक समाज महाराष्ट्र तर्फे वृक्षारोपण

0
70

गोंदिया,दि.09ः-भारत कृषक समाज महाराष्ट्र तर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा राज्यभर 1 ते 15 जुलै 2019 दरम्यान वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरूवात अकोला जिल्हात अध्यक्ष डाॅ. प्रकाश मानकर यांचा नेतृत्वात झाली. त्यातंर्गत ७ जुलै रोजी गोंदिया तालुक्यातील सुदामा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नागरा येथे डाॅ प्रकाश मानकर याच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी प्राचार्य कापगते,श्री.शेंडे,मदनकर, काळबांधे,विनय राहांगडाले,सारवे,राठोड,बघेले, लुटे,कु.पारधी, कु. ठाकुर, डाॅ. ठाकरे, राजेंद्र गावंडे , माधव भारसाकडे, अनिल कोहरे, खुशाल शेंडे जिल्हा अध्यक्ष गोदिया आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी हजर होते. डाॅ.मानकर यानी पर्यावरणाचे महत्व आणि वाढत्या उष्णतेवर प्रतिबंध आणि पावसाला पोषक वातावरण तयार करण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करने महत्वाचे कसे आहे हे पटवून दिले.