24.7 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ गाढवांची धिंड काढून काँग्रेसने केला सरकारचा निषेध

गाढवांची धिंड काढून काँग्रेसने केला सरकारचा निषेध

0
23

चंद्रपूर,दि.13ः- अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेलवर लावलेला कर, राज्य सरकारची शेतकर्‍यांना पीककर्ज वाटपबाबात उदासीनता आणि सुब्रमन्यम स्वामी यांच्या व्यक्तव्याच्या विरोधात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमेटी व अनुसूचित जाती विभागातर्फे ११ जुलै रोजी जिल्हा परिषद पेट्रोल पंप समोरून ते बस स्थानक चौकापयर्ंत गाढवांची धिंड काढून निषेध नोंदविण्यात आला.
बस स्टॉप चौकात जनतेला पुष्पगुच्छ देऊन अच्छे दिन आयेंगे या दिलेल्या खोट्या आश्‍वासनाची आठवण करून देत घोषणाबाजी करण्यात आली. मार्गाने गाढवांची धिंड काढण्यात आल्याने काही वेळ वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला होता. काँग्रेसचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर त्यांना एक निवेदन सोपविले.
याप्रसंगी नंदू नागरकर, सुभाषसिंह गौर, मलक शाकिर, केशव रामटेके, अश्‍विनी खोब्रागडे, संजय र%पारखी, हरीदास लांडे, कुणाल रामटेके, निखिल धनवलकर, सोहेल शेख, इकबाल, घनश्याम वासेकर, बंडोपंत तातावार, शलिनी भगत, सुनीता सिंग, राजू दास, विजय धोबे, निसार खान, युसूफ शेख, नितीन नंदीग्रामवार, कुमारस्वामी पोत्तलवार, डाखरे, राजू अवघडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.