मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

0
12

गोंदिया,दि.13 : भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूका विचाराम घेवून १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारीत विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अशा वंचित नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आणखी संधी मिळावी व त्यांचा मतदार यादीत समावेश करण्यासाठी १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्याचे घोषित केले आहे. त्यानुसार १५ जुलै २०१९ रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी. १५ ते ३० जुलै २०१९ हा दावे व हरकती स्विकरण्याचा कालावधी. २० जुलै २०१९, २१ जुलै २०१९, २७ जुलै २०१९ व २८ जुलै २०१९ हे विशेष मोहिमेचे दिनांक. ५ ऑगस्ट २०१९ पर्यंत पर्यवेक्षक/सहायक मतदार नोंदणी अधिकारी/मतदार नोंदणी अधिकारी द्वारा तपासणी. १३ ऑगस्ट २०१९ पर्यंत दावे व हरकती निकाली काढणे. १६ ऑगस्ट २०१९ पर्यंत उप जिल्हा निवडणूक अधिकारी/जिल्हा निवडणूक अधिकारी/मतदार यादी निरिक्षक यांचेद्वारा मतदार यादीची विशेष तपासणी, डाटाबेसचे अद्यावतीकरण, पुरवणी याद्यांची छपाई इत्यादी. १९ ऑगस्ट २०१९ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. असे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी गोंदिया यांनी कळविले आहे.