30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home राजकीय चंद्रकांत पाटील यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

चंद्रकांत पाटील यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

0
17

नवी दिल्ली दि.१६:- भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी चंद्रकांत पाटील यांच्या नियुक्तीची घोषणा केली. पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे महाराष्ट्रातील आगामी विधानसभेची निवडणूक भाजपा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात लढवणार हे निश्चित झाले आहे.मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. तेव्हापासूनच ते प्रदेशाध्यक्षपद सोडतील, अशी चर्चा सुरू झाली होती. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.