27.2 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ मुख्यमंत्र्यांचा ४९ वाढदिवस,४९ जणांचे रक्तदान 

मुख्यमंत्र्यांचा ४९ वाढदिवस,४९ जणांचे रक्तदान 

0
43
जिल्हा भाजपाचा स्तृत्य उपक्रम;प्रत्येक मंडळात होणार रक्तदान शिबिर
वाशीम,दि.18 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणविस यांच्या ४९ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या विद्यमाने जिल्ह्यातील ९ मंडळांमध्ये २२ जुलैला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवस ४९ वा असल्यामुळे प्रत्येके मंडळात ४९ व्यक्तींचे ४९ बॉटल रक्त दान करण्यात येणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणविस यांचा २२ जुलैला ४९ वा वाढदिवस आहे, परंतु दस्तुरखुद्द  मुख्यमंत्र्यांनीच आपल्या वाढदिवशी बॅनर, पोष्टर, अथवा ईतर भंपकबाजीवर खर्च न करता मुख्यमंत्री सहायता निधीला सहकार्य करण्याचे, तथा विधायक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले आहे. सदर आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांनी जिल्हाभरात रक्तदान शिबिरे घेण्याचे नियोजित केले आहे. जिल्ह्यातील ९ मंडळामध्ये मंडळ अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी व मंडळ पदाधिकाNयांच्या नेतृत्वात सदर शिबिर पार पडणार आहेत. शिबिराच्या नियोजनाची धुरा जिल्ह्याचे सरचिटणीस सर्वश्री पुरूषोत्तम चितलांगे, धनंजय रणखांब, प्रा.सुनिल काळे व संदिप पिंपरकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. प्रत्येक मंडळात ४९ कार्यकर्ते  ४९ बॉटल रक्ताचे दान करणार आहेत. शिबिरामध्ये बहुसंख्य कार्यकत्र्यांनी सहभागी होवून शिबिर यशस्वी करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी केले असल्याची माहिती मिडीया प्रमुख नागेश घोपे यांनी एका पत्रकाद्वारे  कळविली आहे.