27.2 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा- राष्ट्रवादी कॉँग्रेस

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा- राष्ट्रवादी कॉँग्रेस

0
45

गोंदिया,दि.29 : तालुक्यासह जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने सुरू असलेल्या धरणे आंदोलनांतर्गत २६ जुलै रोजी येथील उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना निवेदन देण्यात आले.
जिल्ह्यात मागील पंधरवड्यापासून पावसाने दडी मारली आहे. अपेक्षित पावसाच्या अधार्ही पाऊस अद्याप पडलेला नाही. यामुळे शेतीची कामे अडली असून पेरणी वाळत आली आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. असे असतानाही शासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने तालुकास्तरावर धरणे आंदोलन करून शासनाला निवेदन पाठवून जागे करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
त्यांतर्गत शुक्रवारी (दि.२६) माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांच्या मार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्‍वरी, तालुकाध्यक्ष कुंदन कटारे, बाळकृष्ण पटले, अशोक गुप्ता, जितेंश टेंभरे, केतन तुरकर, रजनी गौतम, अंचल गिरी, सुनील पटले, जगदीश बहेकार, अखिलेश सेठ, आशिष नागपुरे, प्रकाश देवाधारी, सुनिता दोनोडे, योगराज लिल्हारे, रवि पटले, शैलेंद्र वासनिक, पुनाप्रसाद लिल्हारे, नरेंद्र चिखलोंडे, रमेश गौतम, पुरनलाल उके, करण टेकाम, आरजू मेर्शाम, आसीफ सय्यद, छन्नू येळे, धरमलाल रहांगडाले, तेजराम मडामे, हिरामन बावनकर, विकास गेडाम, दुर्याधन मेर्शाम, प्रदीप रोकडे, नितीन टेंभरे, सतीश कोल्हे, मदन चिखलोंडे, शोभा गणवीर, विनायक खैरे, रमेश कुरील, नागो बंसोड, लखन बहेलिया, राजेश रहांगडाले, विजय ठाकूर, उमराव भगत, पंकज चौधरी, राजेश चौळे यांच्यासह कार्यकर्ता उपस्थित होते.