30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home शैक्षणिक २९ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत डी.एल.एड. प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश

२९ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत डी.एल.एड. प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश

0
41

गोंदिया,दि.30 : सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरीता प्राथमिक शिक्षण पदविका (ऊ.एश्र.एव.) प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या तथापी अद्याप शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने त्या विशेष फेरीद्वारे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येतील. प्रवेश प्रक्रिया पुढीलप्रमाणे राबविण्यात येईल. प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य पध्दतीने प्रवेश होईल. यासाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्ज करु शकतात. याबाबत सविस्तर सूचना, पडताळणी केंद्राची यादी, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालय निहाय रिक्त जागा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
यासाठी अर्जदार इयत्ता १२ वी उत्तीर्ण असावा. प्रवेश अर्ज २९ जुलै ते २ ऑगस्ट २०१९ पर्यंत ऑनलाईन भरणे. २९ जुलै ते ३ ऑगस्ट २०१९ पर्यंत पडताळणी केंद्रावर जावून मूळ प्रमाणपत्रे पडताळणी करुन घेणे व ऑनलाईन प्रवेश पत्र प्राप्त करणे. प्रवेश अर्ज शुल्क खुला संवर्ग रुपये २००/- आणि मागासवर्ग संवर्ग रु.१००/- आहे.
यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण भरुन र्अििीेींश घेतला आहे. परंतू प्रवेश घेतलेला नाही असे विद्यार्थी प्रवेश घेवू शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरुस्तीमध्ये आहे, तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरुन प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले उमेदवार अर्ज पूर्ण भरु शकतात. पडताळणी केंद्रावर जावून अर्ज ऑनलाईन र्अििीेींश केल्याशिवाय उमेदवाराचा प्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याने स्वत:च्या लॉगीनमधूनच प्रवेश घ्यावयाच्या अध्यापक विद्यालयाची स्वत: निवड करुन लगेचच प्रवेशपत्र स्वत: ई-मेल/लॉगीनमधून प्रिंट घेवून अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष प्रवेश घ्यावा. यानंतर प्रवेशासाठी कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. असे राजेंद्र गोधने, सहसंचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे यांनी कळविले आहे.