
लोढा,आर.सी.पाटील व रमेश कुथे यांना वगळले
मुंबई,दि.२७ः-भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारला संघटनात्मक बदल करीत प्रदेश उपाध्यक्ष मंगलप्रभात लोढा,आर.सी.पाटील व रमेश कुथे यांना पदमुक्त करीत त्यांच्या ठिकाणी डॉ.सुभाष भामरे,किरिट सोमय्या,प्रविण पोटे पाटील,योगेश गोगावले व अशोक कांडलकर यांची नियुक्ती केल्याची माहिती कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.सोबतच ओबीसी मोर्चा प्रदेशअध्यक्षपदी विकास रासकर तर उपाध्यक्षपदी भूषणqसह होळकर यांची निवड केली आहे.पुणे शहराध्यक्षपदी आमदार माधुरी मिसाळ,पुणे शहर सरचिटणीस गणेश बिडकर,जालना जिल्हाध्यक्ष आ.संतोष दानवे,नाशिक शहराध्यक्ष गिरीश पालवे व यतवमाळ जिल्हाध्यक्षपदी नितीन भुतडा यांची निवड करण्यात आल्याचेही पत्रकात म्हटले आहे.तर मुख्य प्रवक्तेपदी माधव भंडारी,माध्यम संपर्क प्रमुख केशव उपाध्ये,प्रवक्ते मधु चव्हाण,गिरीश व्यास,गणेश हाके,शिरिष बोराळकर,विश्वास पाठक,अतुल शहा,अर्चना डेहणकर,शिवराय कुलकर्णी,भालचंद्र शिरसाट,श्वेता शालिनी व इजाज देशमुख,सुनील नेरळकर यांचा समावेश आहे.यासोबतच वैयक्तिक कारणामुळे प्रदेश उपाध्यक्ष मंगलप्रभात लोढा,आर.सी.पाटील व रमेश कुथे यांच्यासह प्रदेश सरचिटणीस डॉ.संजय कुंटे,अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष जमाल सिध्दीकी,ओबीसी मोर्चा अध्यक्ष विजय चौधरी,कामगार आघाडी सयोंजक संजय केणेकर व व्यापारी आघाडीचे दिलीप कंदकुर्ते यांना पदमुक्त करण्यात आल्याचे म्हटले आहे.





