25.2 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ विमानतळ व रेल्वेसंबंधी खासदारांची आढावा बैठक

विमानतळ व रेल्वेसंबंधी खासदारांची आढावा बैठक

0
29

गोंदिया .दि.0१ :: भंडारा गोंदिया मतदारसंघातील गोंदिया विमानतळ आणि गोंदिया रेल्वे स्थानक ह्या विषयावर चालू असलेल्या कामांचा आढावा आणि प्रस्तावित कामांचे नियोजन यासंबंधी खासदार सुनील मेंढे यांनी गोंदिया येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीला विमानतळ प्राधिकरण अधिकारी एजीएम. शर्मा, रेल्वेचे अधिकारी चव्हाण, नगराध्यक्ष इंगले, उपाध्यक्ष शिव शर्मा तथा भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
गोंदिया रेल्वे स्थानकाची पाहणी करतानाच रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमणावर तातडीने कार्यवाही करावी असेही संबंधित अधिकारी ह्यांना सांगितले असून स्थानक मधील बंद पडलेले स्वयंचलित जिने, लिफ्ट,बसण्याची व्यवस्था तसेच रेल्वे स्थानकाच्या पश्‍चिम भागात सुविधा ड.्रोप एन्ड- गो ची तातडीने दुरुस्ती करून त्या प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिल्याचे खासदारांनी सांगितले. दरम्यान गोंदिया रेल्वेस्थानक आदर्श स्थानक कसे करता येईल ह्याचा एक विस्तृत आराखडा करण्याचे ह्या बैठकीत निश्‍चित करण्यात आले. गोंदिया विमानतळ संबंधी झालेल्या बैठकीत विस्थापित लोकांच्या पुनर्वसन साठी सर्व संबंधित विभागाची एकत्रित बैठक घेण्याचे निश्‍चित करण्यात आले तसेच अतिक्रमणसंबंधी प्रलंबित प्रश्न ठराविक कालावधीत सोडविण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना खासदार मेंढे यांनी दिला.

blank