अर्जूनी मोरगाव,दि.01 : शासन व्यवस्था ही तळागळातील विद्यार्थांना व नागरिकांना पूरक नाही, तर अन्याय करणारी आहे. अशा अन्यायातच माणसाचा बळी जात आहे म्हणून हक्कासाठी लढणे आवश्यक आहे असे प्रतिपादन मार्गदर्शक प्रा. मुन्नाभाई नंदागवळी यांनी व्यक्त केले.परिषदेचे उदघाटन महाराष्ट राज्याचे अध्यक्ष महेश भारतीय मुबंई यांनी केले.अध्यक्षस्थानी राज्याचे उपाध्यक्ष राज डहाट होते.प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबादचे आदेश आटोळे, अलविय कोटांगले, प्रकाश इंगळे, सोनिया डोंगरे, रोहित भगत, सोनटक्के, पंकज नागदेवे, संदिप रहाटे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
शिक्षण अधिकार परिषद वंचित बहुजन आघाडीची सम्यक विद्यार्थी संघ गोंदिया जिल्ह्याच्यावतीने नवेगावबांध बाजार समिती परिसरात ही परिषद (दि.३१) पार पडली.कार्यक्रमाला अनेक ठिकाणाहून विद्यार्थी एकत्र आले होते. नंदागवळी म्हणाले की जर सर्व सामान्य जनतेची सरकार हवी असेल तर ग्रामीण भागाला मजबूत करावे लागेल. आणि सर्वांनी एकीने लढावे लागेल.प्रास्ताविक स्वागताध्यक्ष व्यकंट बागडे तर संचालन व आभार सुरज रंगारी यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रकाशक स्नेहल कांबळे, अशोक खोब्रागडे, संदीप नंदागवळी, दिपेंद्र उके यांनी मेहनत घेतली.





