२५१ कोटी रूपयाचे पीक कर्ज वाटप
बँकेच्या स्वनिधीतून ५८ हजार शेतकरी सभासदांना लाभ
भंडारा,दि.02 : शेतकर्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणार्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले असून ३० ऑगस्ट पर्यंत २५१ कोटी रूपयांचे पीक कर्ज आपल्या स्वनिधीतून ५८ हजार शेतकरी सभासदांना वितरीत केले आहे. दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांचे पीक कर्ज वाटप अद्यापही उद्दिष्टापर्यंत पोहचले नाही. पीक कर्ज वेळेवर मिळाल्याने शेतकर्यांना खरीप हंगामात मो’ा दिलासा मिळाला.
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यंदा खरीप पीक कर्ज वाटपाचे २५० कोटी रूपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. सुरूवातीपासूनच पीक कर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती बँकेने आघाडी घेतली. राष्ट्रीयकृत बँका जेमतेम पाच टक्क्यावर असताना जिल्हा मध्यवर्ती बँक पीक कर्ज वाटपात ५० टक्केच्या वर पोहचली होती. आता तर ३० ऑगस्ट पर्यंत २५० कोटी उद्दिष्टांच्या पेक्षा एक कोटी अधिक म्हणजे २५१ कोटींचे खरीप पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्हा बँकेने आपल्या स्वनिधीतून कर्ज वाटप केले हे येथे उल्लेखनीय. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ४६ शाखांसह जिल्ह्यातील ३३८ सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून अगदी वेळेवर पीक कर्ज वितरीत करण्यात आले. यासा’ी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, बँकेचे अधिकारी, विविध शाखांचे व्यवस्थापक, सेवा सोसायटींचे अध्यक्ष आणि कर्मचार्यांनी सहकार्य केले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तालुकानिहाय पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यात भंडारा तालुक्याला ३७ कोटी ८० लाख उद्दिष्ट होते. उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे ४० कोटी १७ लाख २६ हजार रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. भंडारा तालुक्याचे खरीप पीक कर्जवाटप १०६.२८ टक्के आहे. तुमसर तालुक्याला ३० कोटी २० लाख रूपयांचे उद्दिष्ट होते. बँकेने ३० कोटी ९२ लाख ८८ हजारांचे कर्ज वितरीत करण्यात आले. मोहाडी तालुक्याला ४२ कोटी २५ लाख रूपयांचे उद्दिष्ट होते. येथे ३८ कोटी ३१ लाख रूपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले. पवनी तालुक्याला ३५ कोटी ५० लाख रूपयांचे उद्दिष्ट होते. या तालुक्यात ३६ कोटी ९६ लाख ३५ हजार रूपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले. साकोलीला ३१ कोटी २५ लाख रूपयांचे उद्दिष्ट होते. त्यापैंकी ३१ कोटी ५ लाख ५१ हजार रूपयांचे कर्ज वितरीत झाले. लाखनी तालुक्याला ३७ कोटी रूपयांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ३६ कोटी ४६ लाख ७१ हजारांचे कर्ज वितरीत करण्यात आले. लाखांदूरला ३६ कोटी रूपयांचे उद्दिष्ट होते. येथे ३६ कोटी ९४ लाख १२ हजार रूपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले.
शेतकर्यांची बँक
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकर्यांची बँक म्हणून ओळखली जाते. थेट कर्ज वाटप योजनेंतर्र्गतही विविध शाखांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकर्यांना कमीत कमी कागदपत्रांवर पीक कर्ज शेती निगडीत साहित्य, ट्रॅक्टर, मोटारपंप आदी सा’ी कर्ज दिले जाते. तसेच पगारदार आणि अन्य व्यवसायीकांनाही कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २५१ कोटी रूपयांचे कर्ज वितरीत केले आहे. यासा’ी सर्व संचालकांसह बँकेचे अधिकारी, कर्मचारी आणि सेवा सोसायटीच्या अध्यक्षांसह कर्मचार्यांचे सहकार्य लाभले. वेळेत पीक कर्ज वाटप करून शेतकर्यांची बँक असल्याचे आम्ही सिध्द केले.
-सुनील फुंडे, अध्यक्ष जिल्हा बँक, भंडारा





