लाखांदूर येथे पोषण अभियान कार्यक्रम चे उदघाटन
लाखांदूर,दि.03:महिलांनी शासनाकडून मिळत असलेल्या पोषण आहार चा लाभ घ्यावा.यामुळे कुपोषणावर मात करता येईल असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या प्रिया नाकतोडे यांनी पोषण अभियान कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी केले.लाखांदूर बालविकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत बारव्हा बिट मधील शहरातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस च्या वतीने अंगणवाडी केंद्र क्र.6 मध्ये पोषण अभियान कार्यक्रमाचे उदघाटन अंतरगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रिया तोषित नाकतोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोनिका संजय गाहाने, मीरा बावणे,अंगणवाडी सेविका जयमाला दिवटे,प्रतिभा ठवरे,ज्योती कोडापे, पुष्पा हुमने, सुषमा जांभुलकर,नीता हुमने,विना लुटे, वर्षा रंगारी आदी उपस्थित होते.यावेळी मान्यवरांनी उपस्थित महिला,किशोर वयीन मुली,स्तनदा माता,यांना पोषण आहाराचे महत्व पटवून दिले.तर कार्यक्रमाच्या प्रास्तविक मधून अंगणवाडी सेविका सुषमा जांभुलकर यांनी जन्मतः कमी वजनाचे असणाऱ्या बालकांचे प्रमाण कमी करणे,व 15 ते 49 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलीं व महिला यांचे रक्तल्पता कमी करणे हे या कार्यक्रमाचे ऊद्देश असल्याचे सांगितले .तर 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालक,गरोदर माता,स्तनदा माता,किशोरवयीन मुलींनी योग्य पोषण आहार घ्यावा.व आरोग्यासाठी काळजी घेऊन कुपोषण मुक्त समाज घडविण्यासाठी सहकार्य करावे असेही मत मांडले.कार्यक्रमाचे संचालन प्रतिभा ठवरे यांनी केले.तर आभार प्रदर्शन विना लूटे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी अंगणवाडी मदतनीस नलू प्रधान,शोभा चौधरी,शीला ठाकरे,चांगुला माकडे,प्रमिला बगमारे,चंद्रकला ठाकरे,बिना बोरकर यांनी यासाठी परिश्रम घेतले.





