24.7 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home शैक्षणिक चार शिक्षकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार

चार शिक्षकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार

0
58

नवेगावबांध,दि.03ः-सन २0१८-१९ च्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी येथील जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील सहा. शिक्षक राजेंद्र आत्माराम बावनकर यांची माध्यमिक विभागातून निवड झाली आहे. त्यांच्यासह जिल्यातील चार शिक्षकांची निवड झाली असून शिक्षकदिनी मुंबई येथे त्यांचा सन्मान होणार आहे.
गोंदिया जिल्ह्यातील विविध विभागातून एकूण तीन सहायक शिक्षक व एका शिक्षिकेची राज्य आदर्श श्शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यात बावनकर यांच्यासह प्राथमिक विभागातून जि.प. उच्च प्राथमिक शाळा मुंडीपार, सडक-अर्जुनी येथील पी.जी. साकुरे, जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा खांबी-पिंपळगाव, अजुर्नी मोरगाव येथील शिक्षक मनोहर सूर्यवंशी यांची आदिवासी विभागातून, तर सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी दीक्षा फुलझेले जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा कुंभारटोली यांचा समावेश आहे.
समाजाची नि:स्वार्थ भावने व निष्ठेने सेवा करणार्‍या, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत काम प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यशेचित सन्मान करण्याच्या उद्देशाने दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार १९६२-६३ पासून राज्यात दिले जात आहे. येत्या सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी रंग शारदा मंदिर, बांद्रे, मुंबई येथे होणार्‍या समारंभात त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. सपत्नीक शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व रोख एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.