गोंदिया,दि.०३ : आशा सेविका व गटप्रवर्तकांचा विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन आयटकच्या नेतृत्वात ३ सप्टेंबरपासून राज्यव्यापी कामबंद संप पुकारण्यात आला असून या आंदोलनांतर्गंत मंगळवराला गोंदिया जिल्ह्यातील आशा सेविका व गटप्रवर्तकांनी मोर्चा काढत जिल्हा परिषदेवर धडक दिली.जिल्ह्यातील आठही तालुक्यातून आलेल्या आशासेविका व गटप्रवर्तिकांच्या घोषणांनी जिल्हा परिषदेचा परिषर दणाणून सोडला.आंध्रप्रदेश राज्याच्या धर्तीवर राज्य शासनाने आशासेविका १० हजार रुपये व गटप्रवर्तकांना १५ हजार रुपये मासिक मानधन द्यावे, प्रवास भत्ता द्यावा, सेवानवृत्त वेतन लागू करण्यात यावे, आदी मागण्यांना घेऊन आयटकच्या नेतृत्वात गा मोर्चा काढण्यात आला.अर्थमंत्र्यानी मुंबई मोच्र्यात दिलेले आश्वासन न पाळल्याने बेमुदत संप पुकारण्यात आल्याचे आशासेविकांचे म्हणने आहे.





