30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home शैक्षणिक सैनिक स्कुल सातारा येथे प्रवेश पात्रता परिक्षेकरीता ऑनलाईन अर्ज आमंत्रित

सैनिक स्कुल सातारा येथे प्रवेश पात्रता परिक्षेकरीता ऑनलाईन अर्ज आमंत्रित

0
36

गडचिरोली,दि.५:- प्राचार्य सैनिक स्कुल, सातारा सैनिक शाळेमध्ये इयत्ता ६ वी व इयत्ता ९ वी करीता प्रवेश पात्रता परिक्षा रविवार दिनांक ५ जानेवारी २०२० वेळापत्रक जाहीर केले आहे. वेळापत्रानुसार ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दिनांक ५ ऑगस्ट २०१९ ते दिनांक २३ सप्टेंबर २०१९ पर्यंत आहे.
सैनिक स्कुल सातारा येथे इयत्ता ६ वी व इयत्ता ९ वी करीता प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रवेश पात्रता परिक्षेकरीता ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीकरीता पुढील संकेतस्थळाला भेट दयावी. (( sainikschooladmission.in  किंवा  www.sainiksatara.org ) प्रवेश पात्रता परिक्षेचा गडचिरोली जिल्हयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त ,समाज कल्याण गडचिरोली यांनी केले आहे.