29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home शैक्षणिक शिक्षक हे देश घडवणारे व्यक्ती-प्रा.आशा वणवे यांचे प्रतिपादन

शिक्षक हे देश घडवणारे व्यक्ती-प्रा.आशा वणवे यांचे प्रतिपादन

0
43

लाखनी,दि.06ःडॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे माजी राष्ट्रपती होते, शिक्षणतज्ञ होते, त्यांची जयंती आपण सबंध देशभरात शिक्षकदिन म्हणून साजरी करतो. शिक्षक हे विद्यार्थी घडवतात म्हणजेच पर्यायाने राष्ट्र उभारण्यासाठी कार्य करतात आणि म्हणून शिक्षकांना देश घडवणारे व्यक्तिमत्व म्हणून आपण आदर्शवत मानतो आणि प्रत्येकाच्या जीवनात ती व्यक्ती यशस्वी होण्यासाठी आणि त्या व्यक्तीला शिक्षक सदैव मदत करत असतात, असे प्रतिपादन लिटिल फ्लावर इंग्लिश स्कूल लाखनीच्या प्राचार्य आशा वनवे यांनी केले. द लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूल येथे शिक्षक दिनानिमित्त आयोजित “हॉनरिंग नेशन बिल्डर्स” कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानाहून बोलत होत्या. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका अलका खटके वर्षा बांते प्रामुख्याने उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, पूजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली. शाळेतील सर्व शिक्षकांचा स्वागत सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आला.
मंचावर उपस्थित मान्यवरांनी देखील आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी या दिवशी स्वयंशासन या उपक्रमांतर्गत शिक्षकांची भूमिका कशी असते ती साकार केली. या वेळी विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण देखील केले गेले. काव्यवाचन स्पर्धेत प्रथम कु. अनघा आठवले, द्वितीय खुशी चेटूले, व तृतीय क्रमांक अंजली टिचकुले यांना प्रदान करण्यात आला. स्वयंशासन उपक्रमात प्रथम क्रमांक अक्षता फ़ंदे व श्रद्धा सार्वे, द्वितीय क्रमांक समिग्रा वणवे, तृतीय क्रमांक अंजली टिचकुले व पेजल भुरे यांना प्रदान करण्यात आला. तसेच विविध भूमिकांसाठी वैष्णवी वाघाये, रोहित गायकवाड, पियुष निंबार्ते, अशनवित गजभिये, तनुश्री पंचबुद्धे नसीब तिरपुडे यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्यन खोब्रागडे याने तर प्रास्ताविक समिग्रा वणवे हिने केले आणि आभार प्रदर्शन तनुश्री पंचबुद्धे हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लिटिल फ्लावर स्कूल येथे नव्याने तयार झालेल्या शालेय मंत्रिमंडळाचे तसेच सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.