29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home महाराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटनेचा जत येथे 7 सप्टेंबर ला भव्य एल्गार मेळावा

जुनी पेन्शन हक्क संघटनेचा जत येथे 7 सप्टेंबर ला भव्य एल्गार मेळावा

0
50

9 सप्टेंबर राज्यव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर करणार एल्गार

सांगली,दि.06ः-शासनाने १ नोव्हें,२००५ पासून शासकीय सेवेत असणाऱ्या सर्व कर्मचार्यांना १९८२-८४ ची नागरी जुनी पेन्शन योजना नाकारून अन्यायकारक अंशदायी पेन्शन योजना माथी मारली. हजारो कर्मचार्यांची घरे या योजनेपायी उद्धवस्त झाली. पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा मुलभूत अधिकार असताना अंशदायी पेन्शन योजनेसारखी कुचकामी योजना लागू करून कर्मचार्यांच्या कुटुंबाचे भविष्य अंधकारमय केलेले आहे.
सततचा पाठपुरावा करून सुद्धा पाषाण हृदयी शासनाला पाझर फुटलेला नाही. म्हणून येणाऱ्या ९ सप्टेंबर ला DCPS/ NPS कर्मचार्याने राज्यव्यापी संपाचे हत्यार उपसले आहे. या पार्श्वभूमीवर झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी जत येथे दि.७ सप्टेंबर २०१९ रोजी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी या भव्य एल्गार मेळाव्यास सर्व जेष्ठ कनिष्ठ कर्मचारी बंधू-भगिनी व DCPS/NPS धारकांनी सहकुटुंब उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाकार्याध्यक्ष विरेश हिरेमठ, जिल्हा कन्नड प्रमुख गुरुबासू वाघोली, सूर्यकांत राठोड, राजेश जाधव,पी.डी.राठोड,उल्हास जाधव, सिद्धार्थ जाधव, बाळासाहेब जायभाये,परमेश्वर मुंडे,सुहास उत्तरे,रुपेश मांदळे, बापू मुंडे,सुधीर गायकवाड, मनोज सावरकर, अशोक गर्कल,स्वप्नील नेमाडे,प्रकाश माळी,बजंत्री सर, मनोज सावरकर सर, इम्रान नदाफ, अनिल हिटनळी, दिलीप कांबळे,अशोक गरकल,अभिजित धायगोंडे,रेवन यादव,भीमाशंकर म्हणाकलगी,राजेश देबाजे,काशिनाथ हिटनळी,श्रीरंग सूर्यवंशी,किशोर चलाख,सचिन जाधव,कुमार चौगुले,रमेश धायगोंडे,प्रशांत वाघोली,महादेव टंगोळी,रमेश कोळी,प्रसाद मिरगणे,संजय कापसे, ज्ञानेश्वर पांपटवार,तानाजी कांबळे, दिलीप वाघमारे शिवाजी अवताडे,दिगंबर चाटे,रवींद्र वारद, यांनी केले