अर्जुनी मोर,दि.08:- प्राथमिक शिक्षक हा शिक्षणाचा पाया आहे. शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक शिक्षकांनी यशस्वीरित्या पार पाडावी.अशैक्षणिक कामे सांभाळून विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वेळ शोधणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन नवेगाव बांध क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ अर्जुनी-मोर तर्फे बचत भवन अर्जुनी-मोर येथे आयोजित सत्कार समारंभ व शिक्षक दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून तरोणे बोलत होते. यावेळी उपसभापती करूना नांदगावे, सेवानिवृत्त जिल्हा कृषी अधीक्षक मनोहर चंद्रिकापुरे, पंचायत समिती सदस्य जनार्धन काळसर्पे, संघदिप भैसारे ,रामलाल मुंगणकर, आशा झिल्पे ,गट विकास अधिकारी मयूर अंदेलवाड, शिक्षणाधिकारी एन जे शिरसाठे, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ए.एस.बारईकर उपस्थित होते. यावेळी तालुक्यातून सेवानिवृत्त झालेल्या वाय.बी. येल्ले,जि.बी.हुकरे, आर.टी.मडावी, व्हि.जी.शहारे, टि.ए.चांदेवार, कु.एल.के.शहारे, यांचा सेवानिवृत्त पर तर संघनेचे माजी अध्यक्ष डि.एल.कोकोडे व कोहमारा शाखाध्यक्ष वाय.एस.मुंगुलमारे यांचा शाल,श्रीफळ, डायरी व पेन देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे औचित्य साधून गटशिक्षणाधिकारी एन.जे.शिरसाठे यांनी शिक्षक संघाला पाच हजार रुपये रोख देणगी दिली. त्यावेळी सत्कार मूर्तींनी आपल्या कार्यकाळात केलेल्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकून आलेला अनुभव कथन केले. प्रास्ताविक आर.एस.संग्रामे यांनी केले. संचालन बी.डब्ल्यू.औरासे यांनी तर आभार पवन कोहळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी अरविंद नाकाडे,युवराज खोब्रागडे, डि.एल.मडावी,पी.एन.कापगते, किर्तिवर्धन मेश्राम, पि.के.लोथे,एस.आर.मेंढे, बि.एम.लेंढे,जी.पी.रामटेके, सचिन शेळके,विजय राठोड ,नंदागवळी, नरेंद्र बनकर,मनोहर हातझाडे, युवराज नागपुरे, वसंत नाकाडे, व संघटनेच्या सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.





