गोरेगाव,दि.१०ः- येथील मॉडेल कॉन्व्हेंट आणि ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित महाराष्ट्र प्रज्ञाशोध परिक्षा मार्गदर्शन वर्गाला तालुक्यातील विद्याथ्र्यांनी मोठ्या संख्नेने हजेरी लावून वर्गाचा लाभ घेतला.महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा ,एनएमएमएस परीक्षा,एनटीएस परीक्षेसंबधी विद्याथ्र्यांना सविस्तर माहिती व्हावी यासाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.या मार्गदर्शन वर्गाला मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रज्ञाशोध परिक्षा पुणेचे मानद संचालक डॉ.घाटे उपस्थित होते.त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती. घाटे,मॉडेल कान्व्हेंटचे संस्थापक आर.डी.कटरे,महाराष्ट्र प्रज्ञाशोध परिक्षा तालुका समन्वयक ए.एच.कटरे उपस्थित होते.विध्याथ्र्यांना डॉ. घाटे यांनी आजच्या काळात आवश्यक असलेल्या स्पर्धा परिक्षेबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले.संचालन पद्माकर महाजन यांनी केले.आयोजनासाठी विद्याथ्र्यांनी ए.एच.कटरे आभार मानले.





