राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचे सडक अर्जुनी व तिरोड्यात स्वागत
गोंदिया,दि.१०- गेल्या पाच वर्षापुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मत मागून फडणवीस सरकार सत्तेत आले.पण जनतेची फसवणूक करण्याशिवाय या सरकारने काहीच केलेले नाही.याच जिल्ह्यातून जेव्हा मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्रा गेली असेल तेव्हा पोलिसांची संख्या अधिक राहिली असेल त्यातच आपल्या महाजनादेश यात्रेच्यावेळी सर्वसामान्य न्याय हक्कासाठी लढा देतायेत आवाज उठवतायेत त्यांना नजरबंद करीत असेल तर मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्रा म्हणजेच नौटंकी होय असे परखड विचार खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी केली.
ते सडक अर्जुनी व तिरोडा येथे आयोजित शिवस्वराज्य सभेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.यावेळी खासदार प्रफुल पटेल,प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील,महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकनकर,प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी,जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन,राजलक्ष्मी तुरकर,माजी आमदार राजेंद्र जैन,दिलीप बनसोड,भंडारा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे,विजय शिवणकर,ईश्वर बाळबुध्दे,मेहदुब शेख,रविकांत चरपे,सुरज चव्हाण,शैलेष मोहिते पाटील,मनोहरराव चंद्रिकापुरे,किशोर तरोणे,अविनाश काशीवार,प्रभाकर दोनोडे,रमेश ताराम,हिरालाल चव्हाण,गंगाधर परशुरामकर,प्रेम रंहागडाले,डोंगरे आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना खा.कोल्हे म्हणाले की, ७२ हजाराची मेगाभरती करुन अशी घोषणा या सरकारने केली होती परंतु येथे तर अनेक कंपन्याच बंद पडत आहेत.तरुणाच्या हाती रोजगार राहिलेला नाही.मग कुठ गेली नौकरभरती असा संतप्त सवाल त्यांनी केला.कर्जमाफीची घोषणा केली मात्र त्या कर्जमाफीचा लाभ कुणाला झाला ते सांगाव,पिक विम्याच्या लाभ अद्यापही शेतकèयाला मिळालेला नाही.कायद्या व सुव्यवस्थेची स्थिती वाईट झालेली आहे.माता बहिणी या सुरक्षित राहिलेल्या नाहीत.आवळा देऊन कोहळा देण्याचे काम भाजप सरकार करीत आहे.तरुणाईच्या संकटाचा विचार केला तर गेल्या ४५ वर्षात एवढी बेरोजगारी कधीही निर्माण झाली नाही,तेवढी या पाच वर्षात झाली आहे.अमित शहा यांनी शरद पवारांनी काय केले प्रश्न उपस्थित करुन या महाराष्ट्रातील जनतेला पवारांनी काय काम केले याची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न केला आहे.
शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने बोलतांना खा.प्रफुल पटेल म्हणाले की तुमचे हीत कक्षात आहे,कुणासोबत आहे याचा विचार करायची गरज आहे.ज्यांनी जनतेची कोणतीच कामे केली नाही त्यांच्या मागे आज लोक उभी राहतात याची खंत वाटते असे म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात मिळालेली कर्जमाफी विसरुन लोक आताच्या तुटपुंज्या कर्जमाफीचे गोडवे गावू लागले आहेत.मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्रा म्हणजे खोट्या कामांचा गवगवा असल्याचा त्यांनी उल्लेख केला.
तर गोंदिया भंडारा जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अधिकाधिक संख्येने निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे.येत्या काही दिवसातच काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीची घोषणा होणार असून उमेदवारांच्या नावाची सुध्दा लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.पाटील यांनी भंडारा-गोंदियाच्या सर्वागींण विकासासाठी प्रफुल पटेल यांच्याकाळातच प्रयत्न झाले असून धापेवाडा सारखा प्रकल्प हा पटेलांची देण असल्याचे म्हणाले.यावेळी बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी म्हणाले की,ज्या राज्यात बेरोजगारीचा प्रश्न सोडविला जात नाही,शेतकèयाच्या मालाला हमीभाव दिला जात नाही,लोकांच्या मनात सरकारबद्दल राग असतानाही पुन्हा निवडून येण्याची भाषा करतात ते फक्त ईव्हीएमच्या बळावर अशी टिका केली.या भागात अनेक ओबीसी बहुजन समाजातील भाऊबंद आहे.या समाजाचा अनेक ठिकाणी अपमान करण्याचे काम या सरकारने केले असून राज्यातील असवेंदनशील सरकारला मुळासकट घालविण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.





