41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय विधानसभेकरिता कॉंग्रेसकडून 27 नावांची संभाव्य पहिली यादी

विधानसभेकरिता कॉंग्रेसकडून 27 नावांची संभाव्य पहिली यादी

0
32

blank

मुबंई,दि.11ः- विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच कॉंग्रेस ने राज्यभरातील तब्बल 60 संभाव्य उमेदवारांची नावे  निश्चित केली असून पहिल्या संभाव्य यादीत 25 आमदारांना व दोन इतर उमेदवारांना  कॉंग्रेसने संधी देण्याचे ठरविले आहे,यामध्ये अंतिम यादी प्रसिध्द होईपर्यंत बदलही होऊ शकतात असे सुत्रांचे म्हणने आहे.छाननी समितीच्या बैठकीत या नावावंर चर्चा  करण्यात आली. यामध्ये  प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार,माजी खासदार नाना पटोले,आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह कॉंग्रेसचे विद्यमान आमदार असलेल्या बहुतांश इच्छुकांना पुन्हा एकदा संधी देण्यावर एकमत झालेले आहे.तसेच पक्षबदलामुळे यावेळी युवा चेहर्यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे.संभाव्य पहिल्या यादीतील नावे
  1. बाळासाहेब थोरात (संगमनेर), 
  2. विजय वडेट्टीवार (ब्रम्हपुरी), 
  3. अशोक चव्हाण (भोकर),  
  4. पृथ्वीराज चव्हाण (कराड दक्षिण), 
  5. के सी पडवी (अक्कलकुवा), 
  6. नसीम खान (चांदिवली), 
  7. वर्षा गायकवाड (धारावी), 
  8. अमीन पटेल (मुंबादेवी), 
  9. विश्वजित कदम (पलूस कडेगाव), 
  10. प्रणिती शिंदे (सोलापूर मध्य), 
  11. अमित देशमुख (लातूर शहर), 
  12. नाना पटोले (साकोली), 
  13. अमर काळे (आर्वी ), 
  14. राहुल बोंद्रे (चिखली), 
  15. यशोमती ठाकूर (तिवसा), 
  16. वीरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), 
  17. अमित झनक (रिसोड), 
  18. हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), 
  19. काशीराम पावरा (शिरपूर),  
  20. कुणाल पाटील (धुळे), 
  21. धनाजी अहिरे (साखरी), 
  22. स्वरूप सिंह नायक (नवापूर), 
  23. असिफ शेख (मालेगाव मध्य), 
  24. रणजीत कांबळे (देवळी), 
  25. वसंत चव्हाण (नायगाव), 
  26. संग्राम थोपटे (भोर), 
  27. डॉ संतोष टारफे (कळमनुरी),

blank