27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home शैक्षणिक प्रोग्रेसिव्ह शाळेत हिंदी दिवस साजरा

प्रोग्रेसिव्ह शाळेत हिंदी दिवस साजरा

0
31

गोंदिया : स्थानिक प्रोग्रेसिव्ह ग्रुप ऑफ स्कूल्स मध्ये हिंदी दिवस मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात माता सरस्वती व मुंशी प्रेमचंदच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. हिंदी साहित्यात विशेष कार्य करणारे, हिंदीला उच्च स्थानावर नेण्याचे कार्य सुरू ठेवणार्‍या तसेच साहित्य क्षेत्रात विशेष आवड ठेवणारे पाहुणे उपस्थित होते. यात गर्ल्स महाविद्यालयाच्या प्राध्यापिका संगीता शहारे, डी.बी.सायन्स महाविद्यालयाच्या प्रा. शशी पारधी, एन.एम.डी. महाविद्यालयाच्या प्रा. आशा बघेले, देवरी पंस शिक्षणाधिकारी गणपत शनवारे, गुरूनानक शाळेच्या माजी प्राचार्या मंजु शुक्ला, म्युनिसिपल गर्ल्स शाळेच्या कल्पना मिर्शा, हिंदी विषयाचे अध्यापक राजेंद्रसिंग तोमर, फुलचूर हायस्कूलचे गिरधारी पारधी, बालाघाट येथील ठेमा शाळेतील प्रभारी प्राचार्य भैय्यालाल बिसेन, एकोडीचे भारती पारधी, संस्थाध्यक्ष डॉ. पंकज कटकवार, सचिव डॉ. निरज कटकवार उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनात चंद्रधर शर्मा, प्रेमचंद, गुलाब रॉय, कवि सुरदास, कवियत्री मीराबाई, गुलेरजीं ची ‘उसने कहा था’ या आणि या सारख्या मौलिक कथा कारांची आठवन करून दिली. हिंदी दिवसाच्या औचित्य साधून वेगवेगळय़ा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्था सचिव म्हणाले की, हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. राष्ट्रभाषा हिंदीच्या प्रसार आणि प्रचारासाठी सदैव संस्था अग्रेसर आहे. भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त श्रीमती उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था नित्य नेहमी कार्यरत आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, ज्योती पहिरे, कुमुदिनी तावाडे, वाय. आशा राव, मिनाक्षी महापात्रा, कृष्णा चौहान, निधी व्यास, विना कावडे, वर्षा सतदेवे, रूपकला रहांगडाले, विकास पटले, प्रमोदी वाडी, तुमेश पारधी, रीना साहू, स्मिती शुक्ला, भानुलता लावेटी, राहुल रामटेके, दिव्यांशु जैस्वाल व हिंदी शिक्षक निशा मजुमदार, मनिषा रहांगडाले, उमेश्‍वरा बिसेन, कोमल झा, बी. रामटेके, पुजा अग्रवाल, भागचंद लेंडे, दुर्गा ऊरकुडे, सिमरन बास्के त्याचप्रमाणे सर्व अध्यापक वर्गांनी सहकार्य केले.