30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home शैक्षणिक शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात सहविचार सभा उत्साहात

शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात सहविचार सभा उत्साहात

0
43

गोंदिया,दि.21ः-जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांना घेऊन शिक्षण सभापती  रमेश अंबुले यांच्या नेतृत्त्वात शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात आयोजित सहविचार बैठक पार पडली.या बैठकीला शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे,प्रभारी लेखा अधिकारी मसराम,उपशिक्षणाधिकारी रामटेके,अधिक्षक जनबंधु,शिक्षक संघटनेचे  जिल्हाध्यक्ष राजानंद वैद्य,जिल्हासरचिटणीस हरिराम येळणे,जिल्हानेते नेतराम बिजेवार,जिल्हामहिलाध्यक्ष प्राजक्ता रणदिवे,किर्तीवर्धन मेश्राम,एस.पी.पटले,एस.एम.बिसेन व महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.त्याच प्रमाणे म.रा.जुनी पेंशन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष राज कडव, पदाधिकारी व सभासद उपस्थित आहेत.यावेळी  6 व्या वेतन आयोगाच्या जी.पी.एफ.मध्ये जमा झालेल्या ५ हप्यांच्या कपातीच्या राशीची स्वतंत्र पावती देण्यात यावे. मासिक वेतन वेळेवर देण्याची मागणी रेटून धरण्यात आली.त्यावर शिक्षण विभागाने २५ तारखेपूर्वी बील वित्त विभागात पाठवावे असे मसराम यांनी सांगितले.दिवाळी वेतनासाठी बिलं 7 आॅक्टोबर पर्यंत पं.स.ने जि.प.ला असे पत्र दिल्याचे बैठकित सागण्यात आले.उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची रिक्त पदे अविलंब भरण्यात यावी. विज्ञान विषय शिक्षकाची रिक्त पदे भरण्याची मागणी करण्यात आली. 15% टक्के नक्षल भत्ता अॅरिअस देण्यात यावे. 4% सादिल राशी शाळांना 3 वर्षापासून मिळालेली नाही,ती देण्यात यावी. उच्च परिक्षेत बसण्याची व कार्योत्तर परवानगी आदेश काढण्यास टाळाटाळ होत असल्याबद्दल शिक्षण विभागाच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त करण्यात आले.निवडश्रेणी व चटोपाध्याय वेतन श्रेणी प्रस्ताव प्रलंबित होत असून सेवापुस्तिका अनेक दिवसांपासून जि.प.ला असल्याने शिक्षकांनी रोष व्यक्त केले त्यावर हे प्रकरण लवकरच सोडविण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी यांनी आली.अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त गांवे असून सुद्धा अवघड क्षेत्रातून सुटल्याने पुर्नतपासणी करण्याची मागणी करण्यात आली.शाळांचे विज बिल ग्रामपंचायत मार्फत 14 व्या वित्त आयोगातून भरण्याची मागणी करण्यात आली.आदी विषयावर या सहविचार सभेत चर्चा झाल्या.