30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ गडचिरोली विधानसभा मतदार संघातील तयारी प्रगतिपथावर – डॉ. इंदूराणी झाखड

गडचिरोली विधानसभा मतदार संघातील तयारी प्रगतिपथावर – डॉ. इंदूराणी झाखड

0
31

गडचिरोली दि.-२३:- गडचिरोली विधानसभा मतदार संघातील विविध तयारी व परिस्थितीबाबत लोकांना माहिती देण्यासाठी  विविध प्रसार माध्यमांची पत्रकार परिषद निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी झाखड यांनी आयोजित केली होती. यानुसार निवडणूक अधिसूचना २७ सप्टेंबर रोजी तर नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी अंतिम दिनांक ४ ऑक्टोबरअसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गडचिरोली मतदारसंघातील निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व कामांना सुरुवात झाली असून विविध कामे प्रगतिपथावर आहेत असे त्या यावेळी म्हणाल्या. सर्व विभाग प्रमुख, मतदान कर्मचारी यांच्या बैठका घेऊन आवश्यक सूचना निर्गमित करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राजकीय पक्ष व विविध छपाई पुरवठादार यांचीही बैठका पूर्ण झाल्या असून आचार संहिताबाबतच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व स्तरावर आव्हान करण्यात येत आहे असे त्या म्हणाल्या.
गडचिरोली मतदार संघात एकुण ३४६ मतदान केंद्र असून यामध्ये तीन तालुक्यांचा समावेश होतो. यातील चामोर्शी तालुक्यात १६३, धानोरा तालुक्यात ५२ तर गडचिरोली तालुक्यांमध्ये १३१ मतदान केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे. मतदारांकडे मतदान ओळखपत्र नसल्यास मात्र मतदान यादीत नाव असल्यास निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या ११ प्रकारच्या ओळखपत्र पैकी एक तरी ओळखपत्र मतदाराला दाखवणे अनिवार्य आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आचारसंहितेचा भंग कोणी करत असेल किंवा तसे निदर्शनास आल्यास त्यांनी सी-व्हिजील(उ-तळीळश्र) या या मोबाईल वरती तक्रार नोंदवावी.
उपस्थित पत्रकारांना यावेळी त्यांनी आदर्श आचारसंहिता, पेड न्यूज, ईव्हीएम मशीन याबद्दल थोडक्यात माहिती दिली. यावेळी पत्रकारांसह तहसीलदार गडचिरोली व जिल्हा माहिती अधिकारी उपस्थित होते.