संख(राजेभक्षर जमादार),दि.23ः–म्हैसाळ योजनेचे पाणी न मिळाल्याचा मुद्यावर विधानसभेच्या निवडणुकीत मताधिकाराचा वापर करणार नाही,या मुद्याला घेऊन 64 गावातील नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली होती.त्याची दखल घेत जतचे प्रांत अधिकारी व निवडणुक अधिकारी प्रशांत आवटे यांनी संख येथे निवडणूक बहिष्कार घालणाऱ्या गावातील प्रमुखांना एकत्रित करून बैठक घेत,त्यांचे म्हणने एैकून घेतले.बैठकीला निवडणूक प्रांत अधिकारी प्रशांत आवटे,अपर तहसिदार प्रशांत पिसाळ, नायब तहसिदार विभुते, सपोनि दत्तात्रेय कोळेकर उपस्थित होते.
बैठकीत निवडणूक अधिकारी आवटे यांनी निवडणूक ही लोकशाहीला बळकट करण्यासाठी असून आपण आपल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठीच बहिष्काराएैवजी मताधिकाराचा वापर करुन अडचणी दूर करुन घ्यावे असे आवाहन केेले. पाण्याचा प्रश्न असून तो टप्प्याटप्प्याने नक्की सुटणार त्यासाठी पाठपुरावा करा. निवडणुक संपल्यानंतरही असेच पाठपुरावा करत रहा.सध्या दुष्काळी भागात चालू असलेले टँकर बंद आहेत ते गरज असलेल्या ठिकाणी पुन्हा आम्ही चालू करू व चारा छावण्या ही चालू करू पण तुम्ही आचारसंहिता भंग किंवा पोस्टरबाजी करून निवडणुकीवर बहिष्कार घालून अडथळा निर्माण करण्याचे टाळावे अन्यथा प्रशासन नाईलाजास्तव तुमच्यावर गुन्हे दाखल करेल.त्याएैवजी तुम्ही मताधिकाराचा वापर करुन योग्य लोकप्रतिनिधी निवडून त्यांच्याकडून तुम्ही पाठपुरावा करून घ्या असे विचार व्यक्त केले.
संखचे अप्पर तहसिलदार प्रशांत पिसाळ यांनी तुम्ही सर्व शेतकरी निवडणुकीवर बहिष्कार घालण्यापेक्षा मताधिकाराचा वापर करुन पाहिजे त्या उमेदवाराला निवडून द्या त्यांच्याकडून तुमचे अडचण दूर करून घ्या आचारसंहिता लागू असल्याने शांततेने काम करा असे आवाहन केले.यावेळी उमदीचे सपोनि दत्तात्रेय कोळेकर यांनी बहिष्काराने काही होणार नाही.निवडणुकीवर बहिष्कार घालणे लोकशाहीला धोकादायक असल्याने योग्य लोकप्रतिनिधी निवडा जो तुमचे काम करु शकेल.कुणालाही मताधिकारापासून वंचित ठेऊ नका असे विचार मांडले. तुम्ही जर आचारसंहिता भंग करणे किंवा पोस्टर लावणे परवानगीशिवाय तुम्हाला कोणतेही निर्णय घेता येत नाही. जर घेतले तर कायदेशीर गुन्हे दाखल होतील. कुणालाही अडवू नका पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास बंदी आहे. परवानगीशिवाय कोणतीही रॅली किंवा सभा घेता येणार नाही, संचारबंदी लागू आहे कोणतेही हत्यार बाळगू नये असे सांगितले.
दरीबडचे सरपंच गगांधर मोर्डी यांनी “एक तर अम्हाला पाणी द्या नाहीतर आम्हाला गोळ्या झाडून ठार मारा” कारण आम्ही पाणी मागून वैतागलो आहे. गेले सत्तर वर्ष झाले प्रत्यक्षात पाणी आणून देत नाही म्हणून आम्ही आमचा निवडणुकीवर बहिष्कार ठाम आहे.चंद्रशेखर रेबगोंड यांनी जत तालुका हा कायम दुष्काळी म्हणून जाहीर केले जाते.यंदा पावसाळा संपला तरी अजून पाण्याचा पत्ता नाही व तालुक्यात अनेक ठिकाणी चारा छावण्या पाण्याचे टँकर सुरू आहेत.एक तर आम्हाला पाणी द्या नाहीतर आम्हाला कर्नाटक मध्ये जाण्यास परवानगी द्या. जोपर्यंत पाणी देत नाही तोपर्यंत आमचा बहिष्कार ठाम असल्याचे सांगितले.सोरडीचे मोहनराव गायकवाड यांनी शासन शेतकरी आत्महत्या केल्यानंतर पाच लाख दहा लाख जाहीर करते त्यापेक्षा सध्या गरजू माणसांना कर्ज माफ करून किंवा पाणी देऊन मदत करणे गरजेचे असल्याचे म्हणाले. तिकुंडीचे उपसरपंच मुतू वडीयर यांनी निवडणूकीपूर्वी पुढारी लोक सांगत होते की म्हैसाळचे पाणी आपण आणू नक्की येणार ते पाणी अजून पोचले नाही.मुख्यमंत्री फडवणीस यांची सभा आयोजित केली होती त्यावेळी त्यांनी म्हैसाळ योजनेला तत्वतः मान्यता दिली आहे असे खोटे आश्वासन दिल्यामुळे आम्ही आमचे मौल्यवान मतदान केले होते.आता मात्र आम्ही मतदान करणार नाही आमचा बहिष्कार निर्णय ठाम आहे. जोपर्यंत आम्हाला पाणी देत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही.यावेळी भिमाशंकर बिरादार ,प्रलाद जोशी ,काशिराया रेबगोड,संचिन राठोड ,सुरेश कटरे, अमशीद बिरादार ,असे अने शेतकरी व गावातील संखसह, अंकलगी, तिकुंडी, लमाणतांडा, तिल्याळ, सोरडी, करेवाडी कोबो, दरीबडची , भिवर्गी, गोंधळेवाडी सोन्याळ जाल्याळ व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.




