26.6 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ राजस्व गावाचा दर्जा मिळण्यासाठी बंध्या,बोरी,सावरी गावाचा निवडणुकीवर बहिष्कार

राजस्व गावाचा दर्जा मिळण्यासाठी बंध्या,बोरी,सावरी गावाचा निवडणुकीवर बहिष्कार

0
21

अर्जुनी मोर,दि.05: एकिकडे निवडणुकीचा हंगाम अगदी जवळ आला असताना अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रात निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची जणू काही मालिकाच सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहेत. अर्जुनी मोर तालुक्यातील बोरी व बंध्या गावातील नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे निवेदन ३ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांना सादर केले.
अर्जुनी मोर तालुक्यातील बोरी, सावरी ,काटगाव रीठी मांडोखाल, रयतवारी प्रीठी, व शिंद मरियान गावातील नागरिकांनी दिलेल्या निवेदनानुसार कनिष्ठ अभियंता कार्यालय महागाव येथील बंध्या फिटर मधे सन २0१९ पासुन विज विभागाकडुन फक्त आठ तास कृषी पंपाकरिता विज देणे सुरू आहे. ती शेतीसाठी पुरेशी नसल्याचा आरोप शेतकरी यांनी केला आहे. शेतीसिंचनासाठी २४ तास विज पुरवठा देण्यात यावा ही शेतकरी यांची प्रमुख मागणी आहे. बंध्या गावातील शेतकरी यांच्या ५0 टक्के शेत्या नाल्याच्या पलीकडे आहेत. पावसाळ्यामधे नाल्याला पुर असल्याने नाल्याच्या पलीकडे जाऊन शेती करणे अवघड जाते. त्यामुळे चांगल्या प्रकारे शेतीची मशागत करता येत नाही. तसेच बंध्या गावावरुन केशोरी/ वडेगावकडे जाण्याचे संपुर्ण मार्ग बंद होतात. त्यामुळे बंध्या नाल्यावरती पुलाची आवश्यकता असते. तसेच बंध्या या गावातील लोक जन्मापासून रहिवासी आहेत. बंध्या हा गांव महागाव वरुन ३ कि.मी.अंतरावर आहे. बंध्या या गावाला आजही महागावचाच प्रभाग म्हणुन ओळखला जातो. त्यामुळे बंध्या या गावाला राजस्व गावाचा दर्जा देण्यात यावा असा ठराव शासन दरबारी पडून आहे. सोबतच वनहक्क जमिनीचे पट्टे हा विषय सुध्दा रखडला आहे. इटियाडोह धरणाचे पाणी शेवटच्या शेतकर्‍यांपयर्ंत अजून पोहचले नाही. अशा विविध अडचणी असल्याने बंध्या गावातील नागरिकांनी येत्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आणी अशा आशयाचे निवेदन अर्जुनी मोरच्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांच्याकडे देण्यात आले.

blank