30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ चंद्रपूर जिल्ह्यात ७१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

चंद्रपूर जिल्ह्यात ७१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

0
39

चंद्रपूर,दि.08ः चंद्रपूर जिल्ह्यातील ११0 पैकी ९0 उमेदवारांचे अर्ज निवडणुकीसाठी पात्र ठरविण्यात आले होते. ९0 उमेदवारांपैकी १९ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून आता जिल्ह्यात एकूण ७१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.
राजुरा मतदारसंघातून १६ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरवण्यात आले होते. यापैकी ४ उमेदवारांनी स्वत:ची उमेदवारी अर्ज मागे घेतले असून राजुरा मतदारसंघात एकूण १२ उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे.
चंद्रपूर मतदारसंघातून १६ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. यापैकी ४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून प्रत्यक्ष १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे. यामध्ये अपक्ष म्हणून संदीप पेटकर, तथागत पेटकर, किशोर जोरगेवार, मंदिप गोरडवार, तसेच भारतीय जनता पार्टी कडून नानाजी शामकुळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून बबन रामटेके, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया कडून नामदेव गेडाम, इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाकडून महेश मेंढे, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया कडून अमृता गोगुलवार, बहुजन वंचित आघाडी कडून अनिरुद्ध वनकर, बहुजन समाज पार्टी कडून सुबोध चूनारकर, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी कडून ज्योतीदास रामटेके हे उमेदवार प्रत्यक्ष चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवणार आहेत. अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांना मध्ये ज्योती रंगारी, प्रियदर्शन इंगळे, सुधाकर कातकर, हरिदास लांडे यांचा समावेश आहे.
बल्लारपूर मतदारसंघातून १६ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. यापैकी ३ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून एकूण १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.
ब्रह्मपुरी मतदारसंघातून १४ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. यापैकी ३ उमेदवारांनी स्वत:ची उमेदवारी अर्ज मागे घेतले असून आता एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.
चिमूर मतदारसंघातून १४ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. यापैकी ४ उमेदवारांनी स्वत:ची उमेदवारी अर्ज मागे घेतले असून आता एकूण १0 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे. यामध्ये अपक्ष म्हणून कैलास बोरकर, अजय पिसे, धनराज मुंगले, हरिदास बारेकर, तसेच अखिल भारतीय मानवता पक्षाकडून वनिता राऊत, इंडियन नॅशनल काँग्रेसकडून सतीश वाजुरकर, बहुजन वंचित आघाडीकडून अरविंद सांदेकर, बहुजन समाज पार्टी कडून सुभाष पेटकर, भारतीय जनता पार्टी कडून कीर्तिकुमार भांगडिया, भारतीय शेतकरी कामगार पक्ष कडून प्रकाश नान्हे हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात प्रत्यक्ष उतरणार आहेत. मागे घेतलेल्या उमेदवारांमध्ये गजेंद्र चाचरकर, अमृत नखाते, किशोर घोनमोडे, रमेशकुमार गजबे यांचा समावेश आहे.
वरोरा विधानसभा मतदारसंघातून १४ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. यापैकी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला असून आता एकूण १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे.