30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home Top News बाजारटोल्याच्या तलावात मुर्तीविसर्जना दरम्यान दोन सख्या भावांचा मृत्यू

बाजारटोल्याच्या तलावात मुर्तीविसर्जना दरम्यान दोन सख्या भावांचा मृत्यू

0
36

गोंदिया,दि.०९ः-तालुक्यातील रावणवाडी पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या बाजारटोला येथे दोन सख्या भावांचा मंगळवारच्या रात्री मुर्तीविसर्जनाच्यावेळी तलावातील खोल पाण्यात बूडुन मृत्यू झाल्याची घटना घडली.त्या मृत भावामध्ये अक्षय चितुलाल तेलासे व आकाश चितुलाल तेलासे(वय १८) यांचा समावेश आहे.या दोघांची आई ही अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे.
बाजारटोला जवळीलच कलारीटोला येथे गेल्या २६ वर्षापासून सार्वजनिक दुर्गात्सोव साजरा करण्यात येत असून मंगळवारला मुर्तीचे विसर्जन ठेवण्यात आले होते.ढोलताशाच्या गजरात दुर्गादेवीच्याम मुर्तीला घेऊन मिरवणुक बाजारटोलातील मालगुजारी तलावाजवळ पोचली.यावेळी गावातील १५० ते २०० महिला पुरुष उपस्थित होते.पुजाअर्चना केल्यानंतर २० युवकांनी मुर्तीला विसर्जनाकरीता तलावात नेले.मुर्ती असलेला लाकडी पल्ला काढत असताना अक्षय चितूलाल तेलासे(वय २१)च्या अंगावर आल्याने तो तलावात खोल गढ्डा असलेल्या पाण्यात पडला.त्याला काढून लगेच गोंदियातील खासगी डॉ.बजाज यांच्या सेंट्रल रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिथे मृत घोषित करण्यात आले.त्यानंतर अक्षयचे मृतदेह घरी आणल्यानंतर लहानभाऊ आकाश हा सुध्दा दिसत नसल्याने त्याचा शोध घेण्यास सुरवात करण्यात आली.लगेच गावकरी पुन्हा तलावाकडे वळले आणि तपासमोहीम सुरु करण्यात आली परंतु काहीच मिळाले नाही.आज ९ आक्टोंबरच्या सकाळी ७ वाजेच्या सुमारास पुन्हा रावणवाडी पोलिसांनी मच्छिमारांच्या सहकार्याने शोध मोहिम सुरु केली असता बाजारटोलातील तलावात असलेल्या खोल गढ्यातून आकाशचा मृतदेह बाहेर काढण्यात आले.मोठाभाऊ गढ्यात पडल्याचे बघून तो त्याला वाचविण्यासाठी गेला असावा आणि तो त्या गढ्यात फसल्याने जलसमाधी मिळाली असावी असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे.मुर्ती विसर्जनाच्यावेळी तिथे कुणीही पोहणारा हजर नसल्याने त्या दोन्ही भावांना वाचविता येऊ शकले नाही.अक्षय हा नागपूरात पदवीचे तर आकाश हा दासगावच्या विद्यालयात १२ वीचे शिक्षण घेत होता.सख्या दोन्ही भावांचा या अकाळी मृत्यूने कुंटूबावर शोककळा पसरली आहे.