31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ शनिवारला ओबीसी संघर्ष समितीची कोजागिरी

शनिवारला ओबीसी संघर्ष समितीची कोजागिरी

0
27

गोंदिया: ओबीसी संघर्ष कृती समिती व बहुजन मंचच्यावतीने येत्या १९ ऑक्टोबर शनिवारला यशोदा सभागृह शास्त्री वार्ड येथे शिक्षाप्रद कोजागिरीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे राहणार आहेत. मार्गदर्शक म्हणून आर्थिक गुन्हे शाखेचे उपविभागीय पोलीस अधिकारी महिपालqसह चांदा, वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. एन.जी.राऊत, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बी.एम.करमकर, रामलाल गहाणे, चिरंजीव बिसेन, डॉ. सुवर्णा हुबेकर, शिला नागपुरे, धनवंताबाई उपराडे, डॉ. नोवील ब्राम्हणकर, सुनंदा भुरे, गजानन तरोणे, वसंत निखाडे, आशा तवाडे व गायत्री बल्ले उपस्थित राहणार आहेत. या कार्यक़्रमाला परिसरातील सर्व ओबीसी, बहुजन समाज बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन कैलास भेलावे, मनोज मेंढे, सुनील भोंगाडे, शिव नागपुरे, राजेश कापसे, रवी भांडारकर, संतोष वैद्य, प्रेम साठवणे, राहूल खोब्रागडे, श्री.खुणे, रोहित चौधरी, विजय चिरवतकर, ओमेंद्र पारधी व उत्तम यादव यांनी केले आहे.

blank