अर्जुनी मोरगाव,दि.14ः-कुणबी समाज बहुउद्देशीय सेवा संस्था व जिजाऊ महिला ब्रिगेड अर्जुनी मोरगावच्या संयुक्त विद्यमाने आज(15) सायंकाळी 6 वाजता कोजागिरी पौर्णिमा उत्सवाचे आयोजन प्रसन्ना सभागृहात करण्यात आले आहे.योगप्रशिक्षक दादा फुंडे च्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या कार्यक्रमात गुरुदेव सेवा मंडळाचे दुर्योधन मैंद,डॉ.दिलीप काकडे,इंजी. सुनील तरोने,सुनीता हुमे,बाजार समिती उपसभापती लायकराम भेंडारकर,पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर,जीप सदस्य कमल पाऊलझगडे उपस्थित राहणार आहेत.गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि मार्गदर्शन होणार आहे. प्रसिद्ध नकलाकार हिरालाल पेंटर ची खास मेजवानी यावेळी मिळणार.कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.




