पालांदूर,दि.17 :- भारतीय जनता पक्ष- शिवसेना महायुतिचे लोकप्रिय उमेदवार ना. डॉ. परिणय फुके यांचे साकोली विधानसभा मतदारसंघातील लाखनी तालुक्यातील पालांदूर नगरीत अतिषबाजी व ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅली काढून जंगी स्वागत केले.यावेळी विकासाच्या नावाखाली गेली २७ वर्षे दिशाभूल करणाऱ्या उमेदवारांपासून सावध राहण्याचे आवाहन डॉ.फुकेंने जनतेला केले.या प्रचार यात्रेचे औचित्य साधून पालांदूर बाजार चौकात भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. फुकेंना साकोली विधानसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यास तसेच भावी पिढीला रोजगार मिळवून देण्यास विजयी भवचा आशीर्वाद व पाठिंबा देण्यात आला.यावेळी आमदार बाळाभाऊ काशिवार, शामभाऊ झिंगरे, पद्माकर बावनकर, म.वा. बोळने गुरुजी, तू. रा भुसारी जी, भरतभाऊ खंडाइत, भोजराज भाऊ कापगते, डॉ नंदुरकर यांच्यासह तालुका भाजपचे पदाधिकारी, बुथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




