29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home राजकीय राष्ट्रवादीचे उमेदवार गुड्डू बोपंचेच्या पदयात्रेला मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

राष्ट्रवादीचे उमेदवार गुड्डू बोपंचेच्या पदयात्रेला मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

0
23

तिरोडा,दि.17ः-तिरोडा गोरेगाव मतदारसंघातील कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, आर. पी.आय., पी री पा. महाआघाडीचे अधिकृत उम्मेदवार रविकांत खुशाल बोपचे यांच्या निवडणूक प्रचारार्थ बुधवारला गोंदिया तालु्क्यातील एकोडी,धापेवाडा जिल्हापरिषद क्षेत्रासह सेजगाव जिल्हापरिषद क्षेत्रातील मुंडीपार(एमआयडीसी)फतेपुर,सेजगाव, किंडगीपार, पारडीबांध,ख़ातिटोला, झालूटोला ,वड़द,देवाटोला, बिजाईटोला, पिपरटोला, धापेवाड़ा, लोधीटोला, महालगांव, मुरदाडा, दवनीवाड़ा आदीगावा पदयात्रा, बैलगाडीवर मिरवणुक काढण्यात आलेल्या रोड शोकडे मतदारांचे चांगलेच लक्ष वेधले गेले,सोबतच युवा मतदारांनी गुड्डु बोपचेंच्या नेतृत्वात परिवर्तनाची संधी या मतदारसंघाला मिळाली असून युवा नेतृत्व सक्षम नेतृत्वाच्या घोषणा देत परिसरात उत्साहाचे वातावरण तयार केले आहे. प्रचारयात्रेत रविकांत बोपचे यांचे स्वागत सर्व माता भगिणीने पुष्पवर्षाव  करून मोठ्या उत्साहाने केले. त्याचप्रमाणे गुरुवारला  गराड़ा, मलपुरी, ठाणेगांव,डोंगरगांव गुमाधावड़ा,चुरडी आदी गावांमध्ये पदयात्रा काढून येत्या 21 तारखेला ऱाष्ट्रवादी काँग्रेसच्या घडी चिन्हावर मतदान करुन परिवर्तनातून विकासाची संधी देण्याची विनंती मतदारांना उमेदवार बोपचे यांनी भावनिक आवाहन करुन केली आहे.blankसोबतच काही राजकीय नेते आपल्याविरोधात गैरसमज निर्माण करुन चुकीचा संदेश पसरवित आहेत,त्याला बळी न पडता दुसर्या राज्यातील आलेल्या नेत्यांच्या गैरप्रचारालाही बळी पडू नये असे आवाहन करीत आपण सर्वसामान पोवार समाजातील एक शेतकरी कुटुंबातील व्यक्ती असल्यानेच आपल्याविरुध्द काही लोक गैरसमज पसरवून मतभेद तयार करुन आपली राजकीय पोळी शेकण्याचे काम करीत असल्याची टिका या प्रचारसभा दरम्यान आयोजित सभांच्या माध्यमातून केली आहे.यारॅलीमध्ये जिल्हा परिषद सदस्य,काँग्रेस प्रदेश सचिव डाॅ.योगेंद्र भगत,डाॅ.राधेलाल पटले,पंचायत समितीचे सदस्य काँग्रेस राष्ट्रवादीचे सदस्य, काँग्रेस राष्ट्रवादीचे सरपंच,सहकार नेते,विविध आघाडीतील प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.