41.6 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ एकतेसाठी धावले भंडारावासी;जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवली हिरवी झेंडी

एकतेसाठी धावले भंडारावासी;जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवली हिरवी झेंडी

0
28

भंडारा दि. 01 :- स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिना निमित्ताने राष्ट्रीय एकता दिवस आणि एकता दौड या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने  31आक्टोबर रोजी सकाळी  8 वाजता गांधी चौक, भंडारा येथे  करण्यात आले होते.  यावेळी एकता दौड बरोबरच राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली.जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी एकता दौडला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली.गांधी चौक पासून सुरू झालेली दौड शहरातील विविध मार्गाने मार्गक्रमण करीत शिवाजी क्रीडा संकुल येथे पोहचली. या दौडमधून युवकांना राष्ट्रीय एकात्मतेचा  संदेश देण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. नेहरु युवा केंद्राचे अहिरकर, क्रीडा अधिकारी तसेच  युवकांनी या एकता दौड मध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

blank