गोरेगाव,दि.01 -आदिवासी समाजाचा अनेक वर्षांपासून गोरेगाव या ठिकाणी उपवर -वधु परिचय मेळावा होत आहे. या हलबी समाजाचाच्या परिचय सोहळ्यात गोंदिया जिल्यातुन विविध भागातून ते ग्रामीण झेत्रातील समाज या सोहळ्यात सहभागी होत असतात. या परिचय सोहळ्याच्या माध्यमातून हा समाज एकत्र येऊन एक समाजाचा परिचय होत असतो. व मुला-मुलीचे लग्नाकरिता मुला-मुलीचे नाव सम्पूर्ण शिक्षण, पत्ता, जन्म तारीख, विविध माहिती, फोटो सह फॉर्म भरून आपला परिचय देत असतात. किंवा पालक ही आपल्या मुला- मुली विषयी माहिती या परिचय सोहळ्यात देत असतात .
आदिवासी समाजाच्या या उपवर-वधु परिचय सोहळ्यात जास्तीच जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान समिती चे प्रमुख आयोजक डॉ. एन. डी. किरसान, रामचंद्र फरदे, टी. एम. बिसेन, अजय कोठेवार,निलाराम नाईक, वीरेंद्र चाकाटे, खेमराज भंडारी, तेजराम बिसेन, ऐच.बी राऊत, मुलंचद खाडवाये, चैतराम कोल्हारे, जी. ऐच. खाडवाये, केशव चवारे, शिवानंद फरदे, झामसिग भोयर, सुभाष चुलपार, नरेंद्र दियारी,महेंद्र भोयर, प्रदीप काटेवार, परमेश्वर राऊत, राजेंद्र कूर्पाल, रवींद्र पुगळे, राजेंद्र दियारी, मनोहर काटेवार, प्रमाणनंद चुलपार, योगेंद्र किरसान, स्नेहील काटेवार, यांनी केले आहे.





