30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home शैक्षणिक अश्विन हातझाड़े IES परीक्षेत देशात 13 वा

अश्विन हातझाड़े IES परीक्षेत देशात 13 वा

0
25

कोहळी समाज कर्मचारी संघटनेने केला सत्कार

अर्जुनी मोरगाव,दि.02ः- संघ लोकसेवा आयोगा तर्फे घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी (IES) परीक्षेत अर्जुनी मोरगांव येथील अश्विन केवळराम हातझाड़े हा देशात तेरावा आला आहे. लवकरच त्याची भारतीय अभियांत्रिकी सेवेत राजपत्रित वर्ग 1 च्या पदावर नियुक्ती होणार आहे. त्यांच्या या यशाने गोंदिया जिल्ह्याचे नावलौकिक वाढले आहे त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
अश्विनचे प्राथमिक ते कनिष्ठ महाविद्यालयिन शिक्षण अर्जुनीं मोर येथील सरस्वती विद्यालयात झाले.बारावीनंतर त्याने मैकेनिकल इंजीनियरिंग मध्ये पदवी प्राप्त केली. यूपीएससीची तयारी करून अवघ्या वयाच्या 25 व्या वर्षी त्याने हे यश संपादन केले आहे. सध्या तो नागपुर येथे मेट्रो रेल्वे मध्ये अभियंता पदावर कार्यरत आहे.वडील जि प शाळेत पदवीधर शिक्षक व आई गृहिणी आहेत.अश्विनचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे, तसेच त्यांच्या या यशामुळे या भागातील तरुणांना यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा देण्याची प्रेरणा मिळेल.त्यांच्या या यशाबद्दल कोहळी समाज कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कोहळी समाज कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार , जिल्हासचिव अशोक मस्के, अर्जुनीं मोर चे तालुका सचिव दिलीप लोदी, मार्गदर्शक अमृत लोगड़े, विठ्ठल गायकवाड , अरविंद कापगते आशिष कापगते , ओमप्रकाश मस्के प्रमोद कापगते राकेश डोंगरवार, श्रीमती प्रतिभा डोंगरवार व इतर संघटना पदाधिकारी उपस्थित होते.