40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय हेक्टरी ३० हजाराची मदत द्या राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

हेक्टरी ३० हजाराची मदत द्या राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

0
29

भंडारा,दि.०५-दिवाळीच्या दरम्यान आलेल्या परतीच्या पावसामुळे झालेल्या धानपिकासह इतर पिकाच्या नुकसानभरपाईकरीता हेक्टरी ३० हजार रुपयाची आर्थिक सरसकट मदत देण्यात यावी या मागणीचे निवेदन भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज(दि.५)जिल्हाधिकारी मार्फेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.निवेदन देतेवेळी माजी मंत्री नाना पंचबुधे,माजी खासदार मधुकर कुकड़े,आमदार राजू कारेमोरे,धनंजय दलाल,बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे,अभिषेक कारेमोरे,धनेंद्र तुरकर,रेखाताई ठाकरे,सुनंदाताई मुंडले,यशवंत सोनकुसरे,महेंद्र गडकरी,सुमेध श्यामकुवर,स्वप्निल नशीने,राजकुमार माटे,नरेंद्र झंजाड़,लोमेश वैद्य,देवचंद ठाकरे,राजू पटेल,किरण अतकरी,दयानंद नखाते,सरिता मदनकर,पमाताई ठाकुर,शेखर गभने,हितेश सेलोकर,सुनील साखरकर व इतर मान्यवर पदाधिकारी व,कार्यकर्ता उपस्थित होते.

blank