37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ ग्रामसेवक युनियनच्या शिष्टमंडळाने घेतली आ.अग्रवालांची भेट

ग्रामसेवक युनियनच्या शिष्टमंडळाने घेतली आ.अग्रवालांची भेट

0
25

गोंदिया,दि.07ः-गोंदिया जिल्हा ग्रामसेवक यूनियन  व तालुका शाखा गोंदियाच्यावतीने गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार विनोद अग्रवाल यांचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन यांनी ग्रामीण भागातील गरजू व्यक्ति पर्यंत शासनाच्या लोकउपयोगी योजना पोहोचविण्यासाठी पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करून जनतेची कामे अडू देणार नाही असे आमदार अग्रवालांना आश्वासन दिले.आमदार विनोद अग्रवाल यांनी ग्रामसेवक संवर्गाला येणार्‍या सर्व अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा शब्द देऊन जनतेची कामे प्राधान्याने करण्याचे आव्हान केले.यावेळी शिष्टमंडळमध्ये ग्रामसेवक यूनियन मानद अध्यक्ष कार्तिक चव्हाण, जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन, सरचिटणीस दयानंद फटिंग, कोषाध्यक्ष लक्ष्मण ठाकरे, जिल्हा संघटक रामा जमाईवार, तालुका अध्यक्ष गौतम, पदाधिकारी जी. सी. ठाकुर, हंसराज गजभिये, एल. झेड. चौधरी व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.

blank