27.7 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ आदिवासी समाजाचा उपवर-वधू परिचय सोहळा संपन्न

आदिवासी समाजाचा उपवर-वधू परिचय सोहळा संपन्न

0
47

गोरेगाव,दि.07ः-आदिवासी हलबा/हलबी संघटनेच्या आदर्श (सामूहिक) विवाह सोहळ्याच्या परिचय मेळाव्यात विभिन्न झेत्रातुन मुले-मुली व पालकवर्ग, आदिवासी बांधव, या मेळाव्यात सहभागी झालेले होते. या मेळाव्यात नवं युवकानी आपले परिचय आपले नावासह, जन्म तारीख, मामाचे नाव मुला -मुलीन विषयी अपेक्षा, तसेच आपला विवाह सोहळ्यातच व्हावा. व मुलगी सोहळ्यातच लग्न करणारीच असावी असे परिचय दिले.
या वेळी या सोहळ्याला मार्गदर्शन डॉ. एन. डी. किरसान, म्हणाले की, समाज संघटनेच्या माध्यमातून आपण सर्व आदिवासी समाजाला एकत्र आणण्याचा आमचा ध्यास आहे., हा समाज या परिचय सोहळ्याच्या माध्यमातुन आपल्या पाल्याचा विवाह जोडण्याचा हा उपवर-वधू परिचय सोहळ्यात समाज आपला परिचय देऊन एक संघटन दर्शवीत असते. या सोहळ्यातुन विभिन्न समाजाच्या समस्या चर्चाच्या माध्यमातुन निकाली काढण्यात येतात. तसेच आमगाव क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार मा. सहसराम कोरेटे, याचा उपवर -वधू परिचय सोहळ्यावेळी समाज संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आले.या प्रसंगी आपले विचार प्रकट करतानी म्हणाले की, आमगाव विधानसभा क्षेत्रात उद्योग धंदे, नवयुकाना हाताला रोजगार, शेतकऱ्यांना काम, उपलब्ध करून देण्यात येतील व आदिवासी प्रकल्प कार्यालयातील विभिन्न प्रलंबित समस्याकडे आपण पाठपुरावा करून आमचा विशेष लक्ष आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडे असणार आहे. असे या वेळी बोलत होते.
तसेच या वेळी कर्यक्रमला डॉ. एन. डी. किरसान, नवनिर्वाचित आमदार सहसराम कोरेटे, माजी आमदार रामरतन राऊत, जे. टी. दिहारे, शिवलाल गावळकर, एस.एल. घरतकर, प्रभूदयाल मसे, सी. आर.भंडारी., खुशाल खुटमोडे, हिरालाल भाई, तूलाराम मारगाये, वाय. सी. भोयर, कारूजी फरदे, सुनील कोसमे, तेजराम (छोटू भाऊ) बिसेन, अजय कोठेवार, महेंद्र दियारी, वीरेंद्र सिहं चाकाटे, खेमराज भंडारी, एच. बी. राउत, शंकर राऊत, जी. एच. खाडवाये, द्रविड राऊत, शिवानंद राऊत, झामसिंग भोयर, सुभाष चुलपार, शिवशंकर राऊत, राजेंद्र दिहारे, मनोहर काटेवार, राजेंद्र कूर्पाल, रवींद्र पुगळे, मनोहर काटेवार, एन. एच. हरदुले, राजेश प्रधान, कैलास भोयर, सुरज कोल्हारे, राकेश प्रधान, मालिकचद, मेळे, संजय घासले. आदी. समाज बांधव उपस्थित होते.