गोंदिया : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन साजरा करण्यात येतो. महिलांच्या कोणत्याही विभागाशी संबंधित वैयक्तीक समस्या, गाऱ्हाणी व अडीअडचणी ऐकून घेण्यासाठी 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकशाही दिनामध्ये सर्व महिला कर्मचारी, महिला मंडळ, बचतगट व इतर महिलांसाठी काम करणाऱ्या संस्था येथील महिला थेट सभेमध्ये येवून वैयक्तीक तक्रार नोंदवू शकतात. अर्जाचा नमूना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, खोली क्र.36, जयस्तंभ चौक, सिव्हील लाईन, गोंदिया या कार्यालयात नि:शुल्क प्राप्त होईल. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गोदिया येथे संपर्क साधावा.





