लाखांदूर,दि.10ः- तालुक्यातील शेतकर्यांच्या, बेरोजगार, शेतमजूरांच्या हितासाठी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी १२ वाजता तहसील कार्यालयासमोर खालील मागण्यांच्या पुर्ततेसाठी ठिय्या आंदोलनाचे आयोजन लाखांदूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
यावेळी धानाच्या पिक विम्याची रक्कम सरसकट मिळाली पाहिजे, अकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची मदत सरसकट मिळाली पाहिजे, सर्व शेतकर्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, बेरोजगारी – महागाईचे संकट शासनाने दुर केले पाहिजे. लोडशेडींग बंद करून २४ तास विज पुरवठा झाला पाहिजे. कृषीपंपाचे विज बिल संपुर्ण माफ झाले पाहिजे. साकोली-लाखांदुर रोडचे बंद झालेले काम तातडीने सुरु झाले पाहिजे, इतर प्रमुख मागण्यांसाठी लाखांदूर तहसील कार्यालयसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे, प्रदेश सचिव प्रमिला कुटे, जि. प. सदस्य मनोहर राऊत, तालुकाध्यक्ष भुमेश्वर, जि.प सदस्या प्रणाली ठाकरे, पं. स. सभापती मंगला बगमारे, न. प. गटनेता रामचंद्र राऊत, रामचंद्र पाटील परशुरामकर, नगरसेवक निकेश दिवटे, संजय कोरे, युवक तालुकाध्यक्ष प्रकाशजी देशमुख, सरपंच संघटना अध्यक्ष जितेंद्र पारधी, उपाध्यक्ष मंगला शेंडे, हिरालाल लांडगे, इंटकचे अध्यक्ष संदीप कोरे, सरपंच ताराचंद मातेरे, उत्तम भागडकर, मुनेश्वर दिवटे, होमराज ठाकरे, अध्यक्ष इंटक युवक कांग्रेस मंगेश राऊत, सुभाष खिलवानी, लेकराम ठाकरे, सुनील कुत्तरमारे, विलास पिलारे, बबुल राऊत, पप्पू मातेरे यांच्या उपस्थितीत तहसीलदार संतोष महाले यांना निवेदन देण्यात आले.





